मुंबई: मी ‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात कोणतेही चुकीचे अथवा वादग्रस्त वक्तव्य केले नाही. त्यामुळे मी माझ्या विधानावर ठाम आहे, अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजी महाराजाबद्दल मांडलेल्या भूमिकेबद्दल काही दुमत असण्याचे कारण नाही. मात्र ‘मी कुठे चुकलो का, ते सांगा,’ असा सवाल करीत अजित पवार यांनी माझ्याविरोधात ठरवून भाजपकडून हे आंदोलन केले जात आहे, असा आरोप भाजपवर केला.

महापुरुषांच्या विरोधात वारंवार केलेल्या अवमानजनक वक्तव्यांनी भाजपचे नेते बदनाम झाले आहेत. त्यावर पडदा टाकण्यासाठी माझ्याविरोधात हे आंदोलनाचे षडय़ंत्र रचले जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महापुरुषांविषयींची वक्तव्ये, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच आमदार प्रसाद लाढ, गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यांनी महापुरुषांचा वारंवार अपमान झाला आहे. याबाबत भाजपने अगोदर उत्तरे द्यावीत. मी कोणतेही बदनामीजनक विधान केले नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्न येत नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत काय झाली? हे विधानसभेला…”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

मी या अगोदरही ‘स्वराज्यरक्षक ’असाच उल्लेख केला होता. मी स्वराज्यरक्षक म्हणणे म्हणजे मी चुकीचा असे होत नाही.अर्थसंकल्पीय अधिवेशनात वडु बुद्रूक येथील संभाजी महाराज यांच्या स्मारक उभारणीसाठी २६९ कोटींच्या निधीची घोषणा करतेवेळी मी विधानसभेत ‘स्वराज्यरक्षक संभाजी महाराज’ असाच उल्लेख केला होता. त्यानंतर सर्व सरकारी कागदपत्रांतही तशाच पद्धतीचा उल्लेख आहे. मी विधानसभेत भाषण करतानाही हाच उल्लेख केला. त्या वेळी भाजपचे आमदार उपस्थित होते. त्या वेळी कोणी आक्षेप घेतला नाही.

Story img Loader