शिवसेना (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या एका विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापने वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करायचे का? असा प्रश्न विचारल्याचा गौप्यस्फोट अरविंद सावंतांनी केला आहे. तसेच, मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांनीच उद्धव ठाकरेंना गळ घातली होती, असे अरविंद सावंत यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमके अरविंद सावंत काय म्हणाले?

एक सभेत बोलताना अरविंद सावंत म्हणाले, “शरद पवार म्हणाले होते, काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे दोन दोन मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. ते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का?”

हेही वाचा : “वाचू का? वाचू का?”, मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ प्रसंगाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली

अरविंद सावंत यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “शरद पवारांनी ५०-५५ वर्षांच्या राजकीय जीवनात काम करताना, सर्वच गोष्टींचा आदर केला आहे. अतिशय कष्ट घेऊन आमचे घराणे पुढे आले आहे. पण, अरविंद सावंतांनी सांगितले, रिक्षावाला हा माझा शब्द होता. शरद पवारांचा नाही,” असे अजित पवार म्हणाले आहेत.

हेही वाचा : “हिंमत असेल, तर सावरकरांना भारतरत्न द्या”, अजित पवारांच्या आव्हानाला भाजपाचं प्रत्युत्तर; म्हणाले….

छत्रपती संभाजीनगर येथील सभेला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी वेगळी खुर्ची ठेवण्यात आली होती. यावरून वेगवगळे राजकीय अर्थ काढण्यात येत होते. यावरही अजित पवारांनी भाष्य केले आहे. “उद्धव ठाकरेंना पाठीचा त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे आजही ते ताठ बसता येईल, अशी खुर्ची वापरतात. म्हणून सभेच्या ठिकाणीदेखील अशीच खुर्ची ठेवण्यात आली होती. यात खुर्चीबद्दल कोणताही भेदभाव केलेला नाही,” असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar on arvind sawant statement over sharad pawar rikshawala mahavikas aghadi ssa
Show comments