राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सायंकाळी महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याची माहिती दिली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या या आठवड्यातील दुसऱ्या दिवसाच्या कामाकाजाला सुरुवात होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी विधानसभेच्या सभागृहाबाहेर ही माहिती दिली.

नक्की वाचा >> Shinde vs Thackeray: “मी पक्षप्रमुख असतो तर…”; लांबत चाललेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उज्ज्वल निकम यांचं विधान

“आज सायंकाळी महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तसेच तिन्ही पक्षांचे (शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस) आमदारही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत,” असं अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही विधानसभेमध्ये प्रवेश करण्यापुर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेतकऱ्यांच्या मुद्द्याबरोबरच राज्याच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन शिंदे सरकारला लक्ष्य केलं. “महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं फार नुकसान झालं आहे. मात्र यावर सरकार काहीच करताना दिसत नाही. मुंबईतील वाहतूक पोलिसांना नुकताच धमकीचा एक फोन आला होता. रायगडमध्ये एक संशयास्पद बोट आढळून आली. महाराष्ट्र सुरक्षित नाही. २६/११ च्या आठवणी अजूनही ताज्या आहेत,” असं पटोले यांनी राज्यातील प्रश्नांसंदर्भात म्हटलं आहे.

विधानसभेचा सोमवारचा दिवस नगराध्यक्ष, सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्याचा मुद्दा, विकास कामांच्या निधीवाटप यासारख्या मुद्द्यांवरुन गाजला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे, छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला लक्ष्य केलं. तर सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधकांना उत्तरं दिली. त्यामुळेच आजच्या बैठकीमध्ये अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांमधील मुद्द्यांबरोबरच सर्वोच्च न्यायालयामधील कायदेशीर लढाईसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Story img Loader