राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यामुळे अधूनमधून अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चाही होतात. अशातच काही दिवसांपूर्वी अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे या तिघांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकल्याने चर्चांना उधाण आलं होतं. याबाबत अजित पवारांना विचारलं असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (९ मार्च) एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘कौन बनेगा मुख्यमंत्री’ अशी रस्सीखेच सुरू आहे का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “माझे, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांचे होर्डिंग लावले गेले. ते होर्डिंग आमच्या पक्ष कार्यालयाच्या समोरच लावले गेले. पहाटे येऊन कुणीतरी लावायचं. त्या होर्डिंगची साईजही एकच होती. हा कुणीतरी केलेला चावटपणा आहे.”

Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Gulabrao Deokar, Gulabrao Deokar latest news,
गुलाबराव देवकर यांच्या पक्ष प्रवेशास अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांचा विरोध, पक्ष प्रवेशाच्या विरोधात फलक झळकला
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
BJP leader and MLA Rahul Narvekar elected unopposed as the Speaker of the Legislative Assembly
Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले

“…त्यांना ग्रामीण भागात आम्ही हौसे, नौसे, गौसे म्हणतो”

“उद्या कुणालाही वाटलं की, मुख्यमंत्री व्हावं, तरी ते शक्य नाही. आम्ही १४५ आमदारांचं संख्याबळ मिळवण्यात यशस्वी झालो, पाठबळ उभं केलं तर गोष्ट वेगळी आहे. जसं मागे उद्धव ठाकरेंनी केलं, नंतर एकनाथ शिंदेंनी केलं. काही लोक अतिउत्साही असतात. त्यांना ग्रामीण भागात आम्ही हौसे, नौसे, गौसे म्हणतो,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

“…त्यामुळे कारण नसताना गैरसमज होतात”

“ते असं उत्साहाने काही तरी करायला जातात. त्यामुळे कारण नसताना गैरसमज होतात. तसेच विरोधकांना चर्चेला एक मुद्दा मिळतो. कारण नसताना माध्यमांनाही प्रश्न विचारायला मुद्दा मिळतो,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.

हेही वाचा : नागालँडमध्ये नवाब मलिकांना तुरुंगात टाकणाऱ्या भाजपाबरोबर जाऊन का बसलात? अजित पवार म्हणाले…

तुम्ही तिघे या विषयावर बोललात का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “मी तर माझी भूमिका लगेच स्पष्ट केली. मी शिवाजीराव गर्जेंबरोबर बोललो आणि हे होर्डिंग कोण लावतं आहे, त्याचा बोलवता धनी कोण आहे, मास्टरमाईंड कोण आहे हे बघा असं सांगितलं.”

Story img Loader