राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी लोकलने प्रवास केला आहे. डोंबिवलीत एका नियोजित कार्यक्रमासाठी पोहोचायचं असल्या कारणाने अजित पवार यांनी लोकलने प्रवास केला. यावेळी शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडदेखील त्यांच्यासोबत होते. डोंबिवलीला जाण्यासाठी अजित पवार यांनी सीएसएमटीवरून कसारा जलद लोकलने प्रवास केला. राष्ट्रवादीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अजित पवारांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

डोंबिवलीत एका कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून निघाले होते. पण वाहतूक कोंडीमुळे वेळेत कार्यक्रमाला पोहोचू शकत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी लोकलने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सीएसएमटीवरून प्रवास करत असल्याने अजित पवारांना विंडो सीटच मिळाली.

यावेळी अजित पवार यांच्यासोबत जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाडदेखील होते. अजित पवार यांनी सीएसएमटीवरून कसारा जलद लोकलने डोंबिवली प्रवास केला. यावेळी इतर प्रवाशांनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढले.

 

Story img Loader