मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक जवळ येत असून नाट्यकर्मींची मातृसंस्था असलेल्या अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात ‘रंगकर्मी नाटक समूह’ आणि ‘आपलं पॅनल’ परस्परांसमोर ठाकले आहेत. येत्या १६ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वीच राज्यभरातील ६० पैकी २० जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी दिली. अनेक ठिकाणी नेमक्याच उमेदवारांनी अर्ज केल्याने ते बिनविरोध निवडून आल्याचे त्यांनी म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेली पाच वर्षे मराठी नाट्य परिषद नाट्य विश्वातील विविध उपक्रमांबरोबरच अंतर्गत वादांमुळे अधिकच चर्चेत होती. करोनाकाळात नाट्यसृष्टी ठप्प झाल्यानंतर परिषदेच्या सभासदांनी आणि पदावर असलेल्या मंडळींनी कलाकार, तंत्रज्ञांना आर्थिक साहाय्य केले होते. परंतु त्यावरूनही परिषदेमधील दोन गटांमध्ये वाद झाले.

हेही वाचा – “सत्तेसाठी तुम्हाला काय चाटायचं तर चाटा पण…” उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना सुनावलं

हेही वाचा – मुंबई : संगीतकार अशोक पत्की यांच्या ‘सप्तसूर’चे ऑस्ट्रेलियात आयोजन

अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात राज्यभरात एकूण १०३ उमेदवार उतरले असून मतदारांची संख्या २८ हजार ३११ इतकी आहे. राज्यभरात २९ केंद्रांवर हे मतदान होणार असून १६ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मराठी रंगभूमीच्या संवर्धनासाठी आणि कलेच्या जपणुकीसाठी परिषदेचे आजीव सभासद आणि उमेदवारांसाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची असणार आहे.