एकटय़ा मुंबईत ऑगस्ट महिन्यापर्यंत ४९ मोटरसायकलस्वारांनी अपघातात आपला जीव गमावला.  हा आकडा दरवर्षी वाढतो आहे. त्याची गंभीर दखल घेऊन मोटरसायकलस्वारांमध्ये सुरक्षित प्रवासाच्या उपाययोजनांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने मुंबई पोलिसांनी रविवारी, ८ डिसेंबर रोजी एका अभिनव मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार या रॅलीचे नेतृत्व करणार आहे.
‘सुरक्षित प्रवास’ या एकमेव उद्देशाने मुंबई पोलीस आणि ‘व्हीलिबॉय अॅडव्हेंचर्स’ लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मोटरसायकलवरून प्रवास करताना हेल्मेट वापरण्यापासून कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, याबद्दलच्या सूचना या रॅलीत करण्यात येणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलापासून सकाळी साडेआठ वाजता या रॅलीला सुरूवात होणार असून पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग या रॅलीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
धूम टाळा – आमिर खान
एरव्ही वांद्रे परिसरात तरूणांची टोळीच्या टोळी मोटरसायकवरचे स्टंट्स किंवा शर्यती लावत फिरत असते. मात्र, ‘धूम’ सारखे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हे प्रमाण प्रचंड वाढते, असे मत आमिर खानने व्यक्त केले आहे.  कितीही वेगाचे आकर्षण असले तरी मोटरसायकल स्टंट करू नयेत अथवा शहरात, भर गर्दीत मोटरसायकलच्या शर्यती करू नका, असे आवाहन आमिरने तरूणांना केले आहे.

Story img Loader