मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कांदिवली, आकुर्ली येथील भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत भुयारी मार्गावरील पुलाचे रुंदीकरण पूर्ण करण्यात आले आहे. ११ मीटरवरून २६ मीटर रुंद झालेल्या आकुर्ली पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने मंगळवारी मध्यरात्री तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. केंद्रीय मंत्री आणि स्थानिक खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते हा पूल वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला. या पुल वाहतूक सेवेत दाखल झाल्याने कंदिवली पूर्व ते पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवास वेगवान झाला आहे. त्याचवेळी वांद्रे – बोरिवली प्रवास करणाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

कांदिवली येथील आकुर्ली भुयारी मार्ग ११ मीटर रुंद असल्याने या भुयारी मार्गानजीक प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे एमएमआरडीएने २०१९ मध्ये २६ कोटी रुपये खर्च करून आकुर्ली भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले. हे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनला आहे. सुरुवातीला करोना आणि त्यानंतर तांत्रिक अडचणी यामुळे आकुर्ली भुयारी मार्ग प्रकल्पास विलंब झाल्याचे एमएमआरडीएचे म्हणणे आहे. मात्र या विलंबामुळे प्रवासी, मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामास वेग देत तो लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी होत होती. त्यानुसार आता प्रकल्पाचे एकूण ९० टक्के काम पूर्ण झाले असून भुयारी मार्गावरील पुलाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे ५० टक्के काम पूर्ण झाले असून त्यावरील पुलाचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्याने मंगळवारी रात्री उशिरा हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

carnac Bridge to be inaugurated in June Additional Commissioner inspects bridge work Mumbai news
कर्नाक पूल जूनमध्ये सुरु होणार; पुलाच्या कामाची अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
water pipe bursts in Dombivli
डोंबिवलीत काँक्रीट रस्ते काम करताना जलवाहिनी फुटली;  पी. पी. चेंबर्सजवळ शेकडो लीटर पाणी वाया
Special trains for Konkan and Goa on year end and long weekend
कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या
Work begins on Shirsodi Kugaon bridge in the catchment area of ​​Ujani Dam Pune news
इंदापूर-करमाळा ऋणानुबंध पुन्हा जुळणार; शिरसोडी-कुगाव पुलाच्या कामाला सुरुवात
Water supply cut off in Malad Mumbai news
मालाडमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन
problem of potholes on Khopta bridge to Koproli road will cleared soon
खोपटे पूल ते कोप्रोली मार्ग लवकरच खड्डेमुक्त, एक किलोमीटर रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी सात कोटींच्या निधीस मंजुरी
road along Seawoods creek flamingo habitat was recommended for closure
फ्लेमिंगोंच्या अधिवासात रस्ता नको, राज्य सरकारच्या पाहणी पथकाच्या अहवालात खाडीकिनारचा रस्ता बंद करण्याची शिफारस

हेही वाचा >>>परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा डिसेंबरमध्ये? पात्रता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यास सुरूवात

भुयारी मार्ग ११ मीटरवरून २६ मीटर रुंद करण्यात येणार आहे. त्यानुसार भुयारी मार्गावरील पूल मागील दोन वर्षांपासून बंद करून त्याच्याही रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. या पुलाची रुंदी ११ मीटरवरून २६ मीटर करण्यात आली आहे. दरम्यान, हा पूल दोन वर्षांपासून बंद असल्याने कांदिवली पूर्व परिसरात जाणाऱ्या प्रवासी – वाहनचालकांना वाहतूक कोडींचा सामना करावा लागत होता. आता मात्र रुंद पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने कांदिवली पूर्व परिसरात जाणाऱ्?ा वाहनचालक – प्रवाशांसह पश्चिम द्रुतगती मार्गाने वांद्रे ते बोरिवली प्रवास करणाऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे. रात्री पूल सेवेत दाखल झाल्यानंतर बुधवारी दिवसभर पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी झाल्याचे वाहनचालक-प्रवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान आकुर्ली भुयारी मार्गाचे उर्वरित ५० टक्के काम दीड ते दोन महिन्यात पूर्ण करून तो वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हा भुयारी मार्ग सेवेत दाखल झाल्यास वाहतूक कोंडी दूर होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा >>>अखेर धारावी पुनर्विकासाचे भूमिपूजन रद्द; स्थानिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर डीआरपीपीएलची माघार

श्रेय लाटण्याचा प्रयत्न?

आकुर्ली भुयारी मार्गावरील पुलाचे काम पूर्ण झाल्याने हा पूल लवकरच वाहतूक सेवेत दाखल होईल, असे एमएमआरडीएकडून सांगितले जात होते. असे असताना मंगळवारी रात्री अचानक केंद्रीय मंंत्री पियुष गोयए यांच्या हस्ते हा पूल वाहतूक सेवेत दाखल होणार असल्याची माहिती समाजमाध्यमातून समोर आली. यासाठी मंगळवारी रात्री साडेदहाची वेळ निश्चित करण्यात आली. तर याबाबत एमएमआरडीएकडे विचारणा करण्यात आली असता पुलाच्या उद्घाटनाबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. मंगळवारी मध्यरात्री १२ नंतर गोयल यांचे आगमन प्रकल्पस्थळी झाले आणि त्यानंतर त्यांनी फित कापत पूल वाहतूक सेवेत दाखल झाल्याचे घोषित केले. तर यावेळी या पुलाच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न भाजपाकडून झाल्याची चर्चा होती. तर रात्री उशिरा उद्घाटन करण्याचे प्रयोजन काय असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होता. महत्त्वाचे म्हणजे यावेळी एमएमआरडीएचे कोणीही उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित नव्हते.

Story img Loader