मुंबई : देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना मुंबईत गेल्या वर्षभरात विनयभंगाचे सुमारे दोन हजार गुन्हे दाखल झाल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. तसेच, बलात्कारप्रकरणी ९०० हून अधिक गुन्हे नोंदविण्यात आल्याचे माहिती अधिकारातून निदर्शनास आले आहे. दरम्यान, एका वर्षात महिलांवरील अत्याचार, विनयभंग आणि पॉक्सो नियमांतर्गत तब्बल ४,३५१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१ जुलै २०२३ ते जून २०२४ दरम्यान मोबाइल आणि सोनसाखळी चोरी, दरोडे, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा (पॉक्सो) अंतर्गत गुन्हे, खून, अमली पदार्थांची विक्री, साठवणूक, सेवन आदी घटनांमध्ये २५ हजारांहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आल्याची बाब माहिती अधिकार कायद्याअंतर्गत उघडकीस आली आहे. मुंबईत १ जुलै २०२३ ते जून २०२४ या कालावधीत विनयभंगाचे २२५३ गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे. तर, बलात्काराच्या प्रकरणात ९६४ गुन्हे दाखल झाले आहेत.

हेही वाचा…मुंबई: ‘डिझाइन’चोरल्याच्या संशयावरून मारहाण, एक लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप

मोबाइल आणि सोनसाखळी प्रकरणी ४८५, घरावरील दरोड्यासंदर्भात १३३४, पॉक्सो कायद्यांतर्गत ११३४, खून आणि खुनाच्या प्रयत्नाप्रकरणी ४४४, मद्याधुंद अवस्थेत वाहन चालविल्याप्रकरणी १२,७६७ आणि अमली पदार्थांची विक्री, साठवणूक, सेवन आदी घटनांमध्ये ८,९८२ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, अशी माहिती ही माहिती अधिकारांतर्गत केलेल्या अर्जाच्या उत्तरातून पुढे आली आहे.

वर्षभरातील नोंद गुन्हे

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे – १२,७६७

अंमली पदार्थ विक्री, सेवन – ८,९८२

पॉक्सो – १,१३४

दरोडो – १,३३४

विनयभंग – २,२५३

बलात्कार – ९६४

खून, खुनाचा प्रयत्न – ४४४

चोरी – ४८५

हेही वाचा…आरेतील तीन तलावांत मूर्ती विसर्जनास बंदी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची न्यायालयात भूमिका

१ जुलै २०२३ ते जून २०२४ या कालावधीत दाखल गुन्हे

मुंबईत महिला आणि बालके सुरक्षित नाहीत. पोलीस व गृहखाते नेमके काय काम करत आहे? मुंबईत घडत असलेल्या गुन्ह्यांमध्ये बहुतांश आरोपी परप्रांतीय आहेत. त्यामुळे पोलिसांनी मुंबईत येणाऱ्या प्रत्येक परप्रांतीयांची बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करावी. – संतोष घोलप, माहिती अधिकार कार्यकर्ते

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alarming spike in crimes against women in mumbai over 2000 cases registered of molestation in a year mumbai print news psg