चेंबूर परिसरातील नशा करणाऱ्या गर्दुल्यांना विरोध केल्याने तीन जणांनी वृत्त वाहिनीच्या एका छायाचित्रकारावर चाकू हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. याबाबत टिळक नगर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून दोघाना ताब्यात घेतले. चेंबूरमधील पेस्तम सागर परिसरात वास्तव्यास असलेले छायाचित्रकार मोहन दुबे (३३) यांचा काही दिवसांपूर्वी येथील गर्दुल्ल्यांबरोबर वाद झाला होता. पेस्तम सागर परिसरात नशा करून वावरणाऱ्या गर्दुल्ल्यांना त्यांनी दम दिला होता. त्यामुळे संतापलेल्या गर्दुल्ल्यांनी मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास मोबन दुबे यांच्यावर चाकू हल्ला केला.

हेही वाचा : मुंबई किनारपट्टीलगत डॉल्फिनची गणना करणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

गंभीर जखमी झालेल्या मोहन यांना तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. टिळक नगर पोलिसांनी याप्रकरमी गुन्हा दाखल करून मंगळवारी रात्रीच दोघाना ताब्यात घेतले. मात्र मुख्य आरोपी युसूफ शेख (२८) फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घटनेनंतर पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांनी दुबे यांची भेट घेतली. तसेच आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Story img Loader