कल्याणमधील गणेशघाट विसर्जनाच्या ठिकाणी कचऱ्याच्या ढिगाजवळ दोन महिन्यांचे जिवंत स्त्री अर्भक गुरुवारी रात्री सापडले आहे. या बालिकेला डोंबिवलीतील जननी आशीष या बेवारस लहान मुलांचा सांभाळ करणाऱ्या सामाजिक संस्थेत ठेवण्यात आले आहे. कचऱ्याच्या ढिगाजवळ लहान मुलाच्या रडण्याचा आवाज एका पादचाऱ्याला आला. त्याने जवळ जाऊन पाहिले तर एक जिवंत बालक  तेथे टाकण्यात आले होते. बालिकेच्या हाता- पायांना गंडेदोरे, कपाळावर उभा नाग, गोंदवण असे प्रकार दिसून आले. बाजारपेठ पोलिसांनी हे बालक ताब्यात घेऊन अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader