इंटरनेट, अ‍ॅप्सच्या जमान्यात पत्र पाठविणे, ग्रीटींग पाठविणे हे दुरापास्त झाले असून आता स्वत:चा फोटो किंवा स्वत:च्या प्रिय व्यक्तिचा फोटो अथवा कंपनीचा लोगो लावून स्वत:चा स्टँप तयार करून हे पत्र पाठविण्यासाठी भारतीय डाक सेवेने ‘माय स्टॅम्प’ ही योजना पुन्हा सुरू केली आहे. अवघ्या ३०० रुपयांत १२ फोटो असलेले स्टॅम्प आपल्याला काढून मिळणार असून या योजनेला सध्या उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे सहाय्यक पोस्ट मास्तर जनरल एस बी. व्यवहारे यांनी सांगितले.
आतापर्यन्त बहुतेक आमदार व खासदांरांनी आपले स्टँप बनवून घेतले आहेत. पूर्वी थोर माणसांचे, महान कार्य करणाऱ्या व्यक्तींचीच टपाल तिकिटे काढली जात असत. मात्र ही कल्पना आता भारतीय पोस्ट खात्याने पुसून अगदी राष्ट्रपतींपासून ते सामान्यातला सामान्य माणूस या माय स्टॅम्प योजनेचा लाभ घेऊ शकतो, असे व्यवहारे यांनी सांगितले.
ही योजना मुंबईच्या मुख्य पोस्ट खात्याप्रमाणे इंडियन एअरलाईन्स, नाशिक, पुणे, नागपूर, पणजी, हैद्राबाद येथील मुख्य पोस्ट कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या योजनेत आपल्याला स्वताचे छायाचित्र असलेले १२ फोटो असलेले स्टँप ३०० रुपयांत उपलब्ध करून देण्यात आले आहे. आतापर्यन्त म्हणजे ही योजना सुरू केल्यापासून दीड महिन्यात तीन ते चार हजार सामान्य नागरीकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
हे स्टँप आपण कोणतेही रजिस्टर पत्र, स्पीड पोस्ट अशा ठिकाणी वापरू शकतो असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा