मुंबई : गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवर सरासरी ६७.४० टक्के, तर महाराष्ट्रात ६१.०२ मतदान झाले होते. मात्र, मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या महानगरांमधील मतदान सरासरी ५० टक्केच होते. त्यामुळे महानगरांतील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी चारही महानगरपालिकांनी जनजागृतीवर भर द्यावा, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. मुंबई, ठाण्यात मेच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान असल्याने टक्केवारीवर परिणाम संभवतो, हेही आयोगाने निदर्शनास आणले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर महापालिका आयुक्तांना निवडणूक आयोगाने शुक्रवारी नवी दिल्लीत पाचारण केले होते. या वेळी मुंबईतील घटत्या मतदानाबद्दल निवडणूक आयुक्तांनी चिंता व्यक्त केली. तसेच मोठ्या शहरांमधील मतदानाची टक्केवारी कशी वाढवता येईल, या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही आयोगाने पालिका आयुक्तांना दिले.
हेही वाचा >>>भिवंडीच्या बदल्यात सातारा काँग्रेसला? पृथ्वीराज चव्हाण यांना लढण्यासाठी आग्रह
देशातील ११ राज्यांमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी मतदान झाले होते. देशातील २६६ मतदारसंघांमध्ये (२१५ ग्रामीण आणि ५१ शहरी) राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी मतदान झाले होते. दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळूरु, हैदराबाद, अहमदाबाद, पुणे, ठाणे, नागपूर, पाटणा, लखनौ आणि कानपूर या मोठ्या शहरांमध्ये कमी मतदान झाल्याच्या पार्श्वभूमीवर या शहरांच्या महापालिका आयुक्तांची बैठक आयोगाने घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीरसिंग संधू हेही या वेळी उपस्थित होते. सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीत शहरी भागांतील मतदानाची टक्केवारी घटत असल्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्तांनी चिंता व्यक्त केली. तसेच शहरी भागांमधील मतदानाची टक्केवारी कशी वाढेल यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. गेल्या वेळी देशातील १७ महापालिका क्षेत्रांतील मतदारंसघांमध्ये कमी मतदान झाले होते.
हेही वाचा >>>पालघर, ठाण्यामध्ये सोमवार, मंगळवारी हलक्या सरींची शक्यता
आयोगाचे निर्देश/सूचना…
●मुंबईत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी बेस्ट बस, कचरावाहू गाड्या, बस थांबे यांवर जनजागृतीपर जाहिराती करण्याचे निर्देश.
●उच्चभ्रू वस्त्यांमधील नागरिकांची मतदानाबाबतची उदासीनता लक्षात घेऊन नागरी संकुलांमध्ये मतदान केंद्रे सुरू करण्याची सूचना. नागरी वस्त्यांमधील नागरिकांध्ये जास्तीतजास्त जागृती करण्याचे आदेश
●मॉल्स, उद्याने किंवा लोकांच्या फेरफटका मारण्याच्या ठिकाणी जनजागृतीवर भर, रहिवासी संघटनांची मदत, विविध स्पर्धा आयोजनाचे निर्देश.
●जाहिरात फलकांवर मतदानासाठी प्रोत्साहित करणारे संदेश प्रसारित करण्याबरोबरच समाजमाध्यमांवरून जनजागृतीवर भर देण्याच्या सूचना.
२०१९ मधील मतदान
ठाणे : ४९.३९
पुणे : ४९.८९
नागपूर : ५४.९४
कल्याण : ४५.३१
भिवंडी : ५३.२०
दक्षिण मुंबई : ५१.५९
मुंबई : उत्तर-मध्य ५३.६८
वायव्य मुंबई : ५४.३७
मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मुंबईत विविध उपाय हाती घेण्यात येणार आहेत. बेस्ट बस, जाहिरात फलक आदींचा जनजागृतीसाठी वापर केला जाईल. निवडणूक आयोगाच्या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल. दूरदर्शन, वृत्तवाहिन्या, एफएम रेडिओ या माध्यमांचाही वापर करण्यात येईल. – भूषण गगराणी, आयुक्त, मुंबई महानगरपालिका