एमएमआरडीएचा महत्त्वपूर्ण निर्णय

दहिसर -गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेतील एक्सर आणि दहिसर -अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ मधील आकुर्ली स्थानकाच्या व्यवस्थापनासह स्थानकावरील कारभार चालविण्याची संपूर्ण जाबाबदारी महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. ७६ महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांवर या दोन्ही मेट्रो स्थानकांची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिली आहे. तर मेट्रो प्रकल्पामधील  राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावाही एमएमआरडीएने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> वीजबिल भण्यासाठी ऑनलाईन लिंक पाठवून नागरिकांची फसवणूक, दोघांना रांचीतून केली अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

मेट्रो मार्गिकांच्या व्यवस्थापन आणि संचलनासाठी एमएमआरडीएने महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडची (एमएमएमओपीएल) स्थापना केली आहे. या स्वतंत्र यंत्रणेत २७ टक्के अर्थात ९५८ महिला कर्मचारी-अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अगदी सुरक्षा रक्षकांपासून ते मेट्रो व्यवस्थापक पदापर्यंतची जबाबदारी महिला पार पाडत आहेत. पुरुषांची मक्तेदारी समजली जाणारी आणि आव्हानात्मक अशी कामे ही महिला करीत आहेत. आता एमएमआरडीएने एमएमएमओपीएलमधील ७६ महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दोन मेट्रो स्थानकांचा कारभार सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. महिला सबलीकरणाच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. आकुर्ली आणि एक्सर या स्थानकांमध्ये  महिला कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये काम करणार आहेत. स्थानक व्यवस्थापक, सुरक्षा रक्षक, तिकीट विक्री अधिकारी, पर्यवेक्षक म्हणून महिला या स्थानकांवर कार्यरत असणार आहेत. मेट्रो प्रकल्पात महिला प्रवासी,  महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसह त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा मेट्रो स्थानकात उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All women staff managing akurli eksar metro stations mumbai print news zws