मुंबईतील कामा आल्ब्लेस रुग्णालयात औषध खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप तथ्यहीन असल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून औषध खरेदी न करता केवळ बिले सादर करण्याचा प्रकार सुरु असून ही बिले पास करण्यात आली आहेत, अशी तक्रार प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली होती.

तक्रारीत म्हटले होते की, कामा आल्ब्लेस रुग्णालयात गेल्या कित्येक वर्षांपासून औषध खरेदी न करता केवळ बिले सादर करण्याचा प्रकार सुरु असून ही बिले पास करण्यात आली आहेत. मात्र रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. राजश्री कटके यांनी सांगितले की, संबंधित बिले पुरवठादार कंपनीने चुकीने पाठवली होती, आणि त्याबद्दल त्यांनी लेखी स्वरूपात माफीही मागितली आहे. तसेच, या बिलांवर कोणतीही कार्यवाही झाली नाही, तसेच पुरवठादार कंपनीस कुठल्याही प्रकारची रक्कम देण्यात आली नाही, त्यामुळे हे आरोप दिशाभूल करणारे असल्याचे कटके म्हणाल्या.

प्रशासकीय अधिकारी नाहक लेखी तक्रारी करून रूग्णालयाची बदनामी करत असल्याचा आरोप अधिक्षिकांनी केला आहे.

Story img Loader