मुंबई : करोना केंद्रामधील कथित गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाकलेल्या छाप्यामध्ये जे.जे. रुग्णालयातील डॉ. हेमंत गुप्ता यांचे नाव पुढे आले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जे. जे. रुग्णालय प्रशासनाने स्थापन केलेल्या समितीमध्ये डॉ. अजय भंडारवार यांच्या जागी डॉ. अमिता जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच या समितीमध्ये डॉ. वनश्री पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. डॉ. अजय भंडारवार यांनी रुग्णालय प्रशासनाला केलेल्या विनंतीनुसार त्यांच्या जागी डॉ. अमिता जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जे. जे. रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या औषधांच्य चाचण्यांमध्ये डॉ. हेमंत गुप्ता यांचा सहभाग होता. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने या विभागात झालेल्या चाचण्यांची तपासणी करण्यासाठी चौकशी समिती नेमली आहे. यामध्ये २०१५ पासून सुरू असलेल्या औषधांच्या चाचण्यांची सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. जे. जे. रुग्णालयामध्ये या चाचण्या करणाऱ्या कंपनीच्या १५ कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. चाचण्यांसदर्भातील आर्थिक निकष पाळण्यात आले का? रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे सहाय्य घेण्यात येत होते का? रुग्णालयातील डॉक्टर व रुग्णांना चाचण्यांसाठीचा मोबदला देण्यात येत होता का? आदी चौकशी करण्यात येणार आहे. रुग्णालय प्रशासनाने संबधित विभागातील डॉक्टरांकडून लेखी स्पष्टीकरण घेतले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alleged malpractice case in corona center drug testing committee dr amita joshi mumbai print news ysh