औरंगाबाद शस्त्र-स्फोटके साठा प्रकरण
औरंगाबाद येथून हस्तगत करण्यात आलेल्या शस्त्र आणि स्फोटकांच्या साठय़ाप्रकरणी मुंबई हल्ल्यातील आरोपी झैबुदिन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल याच्याविरुद्ध विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने शुक्रवारी विविध कायद्याअंतर्गत आरोप निश्चित केले.
िवशेष म्हणजे आतापर्यंत ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे न्यायालयासमोर हजर होणाऱ्या जुंदालला आरोप निश्चितीच्या प्रक्रियेसाठी मात्र व्यक्तिश: न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपनिश्चितीनंतर जुंदालने स्वत:ला निर्दोष म्हणवत सर्व आरोप फेटाळून लावले व आपण ‘सिमी’ वा लष्कर-ए-तोयबा यापैकी कुठल्याही दहशतवादी संघटनेचा सदस्य नसल्याचा दावाही त्याने केला.
दहशतवादी कारवायांसाठी शस्त्र व स्फोटके वितरीत केल्याप्रकरणी जुंदालवर ‘मोक्का’, भारतीय दंडविधान, शस्त्रास्त्र कायदा, स्फोटके कायदा आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा आदी विविध कायद्याअंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले. त्याआधी दहशतवादविरोधी पथकाने जुंदाल हा १९९६ सालापासून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे सांगितले.
दरम्यान, जुंदालला आर्थर रोड तुरुंगातील दहशतवादी कसाबसाठी बनविण्यात आलेल्या कडेकोट सुरक्षा असलेल्या ‘अंडासेल’मध्ये ठेवण्यात आले आहे.
मात्र त्याबाबत त्याचे वकील एजाज नक्वी यांनी एक अर्ज करून जुंदालला कोठडीत एकटे ठेवले जाऊ नये, अशी विनंती केली
अबू जुंदालवर आरोप निश्चित
औरंगाबाद येथून हस्तगत करण्यात आलेल्या शस्त्र आणि स्फोटकांच्या साठय़ाप्रकरणी मुंबई हल्ल्यातील आरोपी झैबुदिन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल याच्याविरुद्ध विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने शुक्रवारी विविध कायद्याअंतर्गत आरोप निश्चित केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-02-2013 at 04:46 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alligations are final on abu jundal