मुंबई : खासगी रुग्णालयांना एका महिन्याचा साठा खरेदीची मुभा केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. नव्याने लसीकरण सुरू करणाऱ्या खासगी रुग्णालयांना खाटांच्या क्षमतेनुसार लशींचा साठा देण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांकरिता लस खरेदीची नवी नियमावली जाहीर करण्यात आली असून ही नियमावली १ जुलैपासून लागू झाली आहे. यात ‘कोविन’ अ‍ॅपद्वारेच लस खरेदीची परवानगी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लसीकरणाच्या नव्या धोरणानुसार २१ जूनपासून २५ टक्के लससाठा खासगी रुग्णालयांना विक्रीची मुभा केंद्राने दिली आहे. राज्यांना आवश्यकतेच्या तुलनेत लशींचा साठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाची गती गेल्या काही दिवसांपासून मंदावली आहे. केंद्राने मात्र लशीचा तुटवडा असल्याचे नाकारत राज्यांनीच नियोजन योग्य रीतीने करायला हवे अशी भूमिका व्यक्त  के ली आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये दरदिवशी केल्या जाणाऱ्या सरासरी लसीकरणानुसार दर महिन्याचा लशीचा साठा ठरवण्यात येईल. आधीच्या महिन्यात झालेल्या लसीकरणापेक्षा दुप्पट लशीचा साठा खरेदी करण्याची कमाल मर्यादा असेल.