काळाचौकी येथील आंबेवाडी पुनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्रख्यात बांधकाम व्यावसायिक लोढा यांच्या कंपनीसह पाच बिल्डरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
 परळच्या आंबेवाडी मध्ये उभ्या राहणार असलेल्या एका बहुमजली टॉवरमध्ये अ‍ॅड वकेश जैन यांनी फ्लॅट बुक केला होता. त्यासाठी त्यांनी इस्क्यु फिनॅक या कंपनीकडे १४ लाख रुपये भरले होते. परंतु त्यांना या फ्लॅटचा ताबा मिळाला
नाही.
 याप्रक रणी अनेक कंपन्यांकडे बोट दाखवून टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे जैन यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली. त्यात लोढा बिल्डरसह पाच बिल्डर आणि विकासंकावर २००३ पासून विविध कंपन्या काढून खरी माहिती दडवुन फसवणुक केल्याचा आरोप ठेवण्यात आला
आहे.
गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुनात या बिल्डरांनी तक्रारदार व इतरांची ६४ लाखांची फसवणुक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.फ्लॅटचा ताबा न देता विकासहक्क परस्पर विकल्याचा आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे.     

Story img Loader