केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘धनुष्याबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर सोमवारी दोन्ही गटाला नवे नाव दिले होते. तसेच उद्धव ठाकरेंच्या गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले होते. दरम्यान, आज निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – मोठी बातमी! ठाकरे गटाच्या ‘धगधगत्या मशाली’ला शिंदे गट ‘ढाल-तलवारी’ने देणार उत्तर; निवडणूक आयोगाने दिला निर्णय

काय म्हणाले अंबादास दानवे?

“मला वाटते ही ढाल भाजपाची आहे आणि तलवार गद्दारांची आहे. ही ढाल बोथट होत असून तलवारीला महाराष्ट्र नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही”, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे.

हेही वाचा – Shinde vs Thackeray: ‘ढाल-तलवार’ चिन्हावरून सुषमा अंधारेंचा शिंदे गटावर निशाणा; म्हणाल्या, “ही ढाल केवळ गद्दारी…”

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘धनुष्याबाण’ हे चिन्ह गोठवल्यानंतर सोमवारी दोन्ही गटाला नवे नाव दिले होते. उद्धव ठाकरेंच्या गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ असे नाव तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना, असे नाव देण्यात आले होते. तसेच उद्धव ठाकरेंच्या गटाला ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आले होते. मात्र, आता शिंदे गटालाही चिन्ह मिळाल्यानंतर अंधेरी पोटनिडणुकीत मशाल विरुद्ध ढाल-तलवार असा सामना रंगणार आहे.

Story img Loader