मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क मैदानातील अतिरिक्त धुळीवरील उपाययोजना येत्या ६ डिसेंबरला होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानंतर केल्या जातील, असे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले होते. मात्र ६ डिसेंबरपूर्वी ही माती हटवावी आणि आंबेडकरी अनुयायांना आरोग्यदायी वातावरण द्यावे, अशी मागणी मंगळवारी काही आंबेडकरी संघटनांनी केली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. दादरच्या शिवाजी महाराज उद्यानातील धुळीचा प्रश्न काही मिटण्याचे नाव घेत नाही. गेल्या आठवडय़ात शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांनी मैदानातच आंदोलन केल्यानंतर  प्रशासनाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. छत्रपती शिवाजी महाराज मैदानात असलेल्या ३५ रिंगवेल विहिरींमधून उपलब्ध होणारे पाणी या मैदानावर फवारून धूळ थोपविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच मैदानावरील हिरवळ वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

तसेच धुळीच्या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक करून, त्यांच्या सल्ल्याने प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र कितीही पाणी मारले तरी ते अध्र्या तासात सुकत असल्याचा आरोप शिवाजी पार्क रहिवासी संघटनेचे प्रकाश बेलवडे यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा दिवसभर धूळ उडत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अतिरिक्त लाल माती काढून टाकणे हाच त्यावरचा उपाय असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.दरम्यान, मंगळवारी देखील शिवाजी पार्क परिसराची पाहणी करण्यासाठी रहिवासी संघटनांच्या प्रतिनिधीसोबत खासदार राहुल शेवाळ, पालिकेचे अधिकारी मैदानात आले होते. तसेच बहुजन परिषदेचे प्रदेश अध्यक्ष यशवंत गंगावणे यांनीही शिवाजी पार्क मैदान परिसरातला भेट दिली. तसेच आंबेडकर जयंतीपूर्वी मैदानातील माती हटवावी, धुळीवर उपाययोजना कराव्यात अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या मैदानासाठी पालिकेने जेव्हा उपाययोजना करायचे ठरवले होते त्यावेळी मैदानात माती आणि शेणखत असे दोनास एक प्रमाणात टाकण्याचे ठरवले होते. मात्र पालिका प्रशासनाने अर्धवट काम केले. केवळ माती टाकल्यामुळे ती वाऱ्याबरोबर उडते, असा आरोप बेलवडे यांनी केला आहे.

Navi Mumbai Municipal Corporation Encroachment Department takes action against illegal constructions in Nerul and Ghansoli
नेरुळ, घणसोलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई; महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून बांधकामे
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
police action on massage parlour misbehavior is going on in name of massage parlour
मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकारांवर कारवाईचा बडगा, वर्षभरात पोलिसांकडून ३३ गुन्हे दाखल
Property tax defaulters properties seized in Titwala
टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
clean up marshal action against those responsible for littering
क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा
Peoples representatives do not want helmets then why police insisting Jan Manch organization Question
लोकप्रतिनिधींना हेल्मेट नको, मग पोलिसांचाच आग्रह का? जनमंचचे राजीव जगताप म्हणतात, ‘पायी चालणाऱ्यांनाही…’

हेही वाचा >>>मुंबईत सणासुदीच्या काळातही घरांची विक्री दहा हजारांवरच; मुद्रांक शुल्कापोटी सरकारला ८२२ कोटी

दिवाळीनंतर माती हटवू – राहुल शेवाळे

शिवाजी पार्क मैदानातील धुळीवर उपाययोजना आणि सुशोभिकरण असे दोन  प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. त्यापैकी सध्या तातडीने धुळीवर उपाययोजना करण्यात येणार असून माती हटवण्याचे काम प्राधान्याने ६ डिसेंबरपूर्वी केले जाईल, असे आश्वासन राहुल शेवाळे यांनी दिले. दिवाळीनंतर हे काम केले जाईल, असे ते म्हणाले. तसेच मैदानात प्रतिदिन पाणी फवारण्याकरीता सुमारे दोन लाख ९० हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे. सध्या मैदानातील ३५ रिंगवेलमधील उपलब्ध पाणी संपूर्ण मैदानात फवारण्यात येते. मात्र येत्या काळात माहीम येथील सांडपाणी प्रकल्पातील पुनप्र्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करता येईल का याचीही चाचपणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. टँकरने पाणी आणून ते इथे फवारण्यात येईल. तसेच मैदानात चार ठिकाणी धूळ शोषून घेणारी यंत्रणा बसवण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader