मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क मैदानातील अतिरिक्त धुळीवरील उपाययोजना येत्या ६ डिसेंबरला होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानंतर केल्या जातील, असे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले होते. मात्र ६ डिसेंबरपूर्वी ही माती हटवावी आणि आंबेडकरी अनुयायांना आरोग्यदायी वातावरण द्यावे, अशी मागणी मंगळवारी काही आंबेडकरी संघटनांनी केली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. दादरच्या शिवाजी महाराज उद्यानातील धुळीचा प्रश्न काही मिटण्याचे नाव घेत नाही. गेल्या आठवडय़ात शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांनी मैदानातच आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. छत्रपती शिवाजी महाराज मैदानात असलेल्या ३५ रिंगवेल विहिरींमधून उपलब्ध होणारे पाणी या मैदानावर फवारून धूळ थोपविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच मैदानावरील हिरवळ वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा