लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपचा ‘अब की बार चारशे पार’ हा जो नारा दिला आहे, तो राज्यघटना बदलण्यासाठी आहे, असे सांगत त्याला विरोध करण्याकरिता महाराष्ट्रातील आंबेडकरवादी, डावे, पुरोगामी साहित्यिक तसेच बिगरराजकीय संघटनांमध्ये कार्यरत असलेले कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. या निवडणुकीत मतविभाजन टाळा आणि महाविकास आघाडीला मतदान करा, असे आवाहन त्यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.
कोणत्याही निवडणुकीत बहुमत मिळविण्याचा प्रत्येक पक्ष दावा करतो, परंतु भाजपचा चारशे पार म्हणजे चारशेपक्षा जास्त जागा मिळविण्याचा नारा कशासाठी तर त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलायचे आहे, त्यामुळे या निवडणुकीत भाजपला रोखणे आवश्यक आहे, अशी भूमिका घेऊन साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील लेखक, कार्यकर्ते, कलावंत पुढे सरसावले आहेत. या संदर्भात एक संयुक्त निवेदन प्रसृत करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>वाढत्या तापमानात आज मतदान; राज्यात आठ जागांवर २०४ उमेदवार रिंगणात
या निवेदनाबाबत बोलताना माजी सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर म्हणाले की, आंबेडकरी समाजाचे मतविभाजन झाले की, त्याचा फायदा भाजपला होतो, त्यामुळे मतविभाजन टाळणे आवश्यक आहे. या संदर्भात मुंबईत एक बैठक घेण्यात आली. श्याम गायकवाड, संजय अपरांती व आपण स्वत: असे अनेक कार्यकर्ते त्याला उपस्थित होते, असे त्यांनी सांगितले.
कुणाचा पाठिंबा?
डॉ. सुखदेव थोरात, डॉ. रावसाहेब कसबे, जी.जी. पारिख, श्याम मानव, कुमार सप्तर्षी, तुषार गांधी, माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर, सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी व लेख उद्धव कांबळे, डॉ. संजय अपरांती, श्याम गायकवाड, इरफान इंजिनीअर, अभिनेत्री स्वरा भास्कर, तिस्ता सेटलवाड, सुरेश खोपडे.