मराठवाडय़ातील मागील पिढीतील दलित पँथरचे लढाऊ कार्यकर्ते आणि डेमॉकॅट्रिक रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार टी. एम. कांबळे यांच्या अकाली निधनाने आंबेडकरी चळवळीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, अर्जुन डांगळे, गौतम सोनावणे, तसेच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
आठवले यांच्याशी मतभेद झाल्यानंतर कांबळे पक्षातून बाहेर पडले आणि भाई संगारे व चंद्रकांत हंडोरे यांच्या मदतीने त्यांनी स्वतंत्र रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. पुढे भाई संगारे यांचे निधन झाले आणि हंडोरे यांनी काँग्रेसची वाट धरली, परंतु इतर कोणत्याही पक्षात न जाता कांबळे यांनी डेमोक्रॅटिक रिपब्लिकन या नावाने आपला स्वत:चा गट चालू ठेवला. त्यांनी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लढविल्या, परंतु त्यात यश मिळाले नाही. गेली दोन वर्षे ते किडनीच्या विकाराने आजारी होते. लातूरमध्ये शनिवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधानबद्दल आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा