पालिका शाळांमधील विद्याथ्र्र्याना आयआयटीत प्रवेश मिळवून देण्यासाठी पालिकेने आणखी एका क्लाससोबत दोन वर्षांसाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. दादर येथील शाळेत ज्युनिअर कॉलेजचे वर्ग या क्लासकडे सोपवण्यात येणार असून त्या मोबदल्यात पन्नास टक्के जागा पालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षित ठेवल्या जातील. शिक्षण समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला
पालिका शाळेतील मुलांनाही स्पर्धेसाठी तयार करावे या हेतूने चार वर्षांपूर्वी आयआयटियन्स पेस आणि युक्ती या दोन संघटनांसोबत करार करण्यात आला होता. दादर येथील भवानी शंकर कनिष्ठ महाविद्यालय तसेच मुलुंड येथील रत्नाबाई वालबाई कनिष्ठ महाविद्यालयातील जागा ‘पेस’ या संस्थेला देण्यात आली होती, तर विलेपार्ले येथील दीक्षित रस्ता कनिष्ठ महाविद्यालयातील जागा ‘युक्ती’कडे होती. या क्लासमधील पन्नास टक्के जागा पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. मुलांना स्पर्धात्मक जगासाठी तयार करण्याची जबाबदारी या क्लासवर होती. मात्र चार वर्षांनंतर पालिकेतील एकही विद्यार्थी आयआयटीत प्रवेश मिळवू शकला नाही. त्यामुळे दादर येथील महाविद्यालयाची जबाबदारी या क्लासचा स्पर्धक असलेल्या ‘विद्यालंकारला’ या वर्षीपासून देण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण समितीने घेतला.  दोन वर्षांसाठी ही जागा देण्यात आली असून त्या कालावधीत पालिकेच्या मुलांना आयआयटीसाठी तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Story img Loader