दहा वर्षाच्या मैत्रीमध्ये प्रेमाचे अंकुर फुलल्यानंतर आज अमित आणि मिताली विवाहबंधनात अडकणार आहे. राज ठाकरे यांचा पुत्र आणि मुंबईचे प्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडेंच्या कन्या मिताली थोड्यात वेळात लग्नाच्या बेडीत अडकतील. या दोघांच्या निस्सिम प्रेमाची गोष्ट सध्या तरूण वर्गात चर्चेचा विषय आहे.

दोघांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत पार पडले. अमितचे शिक्षण पोतदार कॉलेजमध्ये तर मितालीचे रूईया कॉलेजमध्ये झालं आहे. पोतदार आणि रूईया ही दोन्ही कॉलेज जवजवळ आहेत. कॉलेजमधील ओळखीच्या मित्र-मैत्रिंणीमुळे यांची कॉलेज परिसरात पहिल्यांदा भेट झाली. कला शाखेत शिकणारी मिताली आणि कॉमर्समध्ये असणारा अमित यांच्यामध्ये चांगलीच मैत्री जमली. त्यांनतर ही मैत्री आणखी घट्ट होत गेली.

दोघांच्या मनांमध्ये प्रेमाचे वारे वाहत होते. काही वर्षानंतर शांत स्वभावाच्या अमितने एक मितालीला प्रपोज केलं. मितालीनेही क्षणाचा विलंब लावता होकार कळवला. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री आणि प्रेम सुरू झालं. पाहता पाहता त्यांच्या या नात्याला तब्बल दहा वर्ष दोघे एकत्र होते.
अमितची बहिण उर्वशी आणि मिताली दोघीही चांगल्या मैत्रिणी होत्या. त्यामुळे मितालीचे कृष्णकुंजवर येणं-जाणं सुरूच होतं. मितालीचे सतत घरी येण्यामुळे राज ठाकरेंना अमित-मितालीच्या नात्याची कुणकुण लागली होती. दोघांनीही आपल्या घरी प्रेमाविषयी सांगितले. कुटुंबियांना त्यांच्या नात्याबद्दल आधीच माहित असल्यामुळे दोन्ही कुटुंबांनी होकारही दिला. २०१७ मध्ये अमितला दुर्धर आजारानं ग्रासले होते. त्यावेळी मितालीने अमितला भक्कम साथ दिली. तिने अमितची काळजी घेतली. त्यासोबतच राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंना धीर दिला. अमित आजारपणातून बाहेर आल्यानंतर काही दिवसातच दोघांचा साखरपुडा झाला. आता आज दोघेही विवाहबंधनात अडकतील आणि नव्या आयुष्याला सुरूवात करतील.

वांद्र्यांच्या फॅशन इस्टिट्यूटमधून मितालीने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. राज यांची धाकटी कन्या उर्वशी ठाकरेंसोबत ‘द रॅक’ नावाचं बुटीकही तिने सुरु केलेलं आहे.

Story img Loader