बृह्नमुंबई महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन करून बांधलेल्या मॉलमध्ये अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी पैसे गुंतविल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंग यांनी बुधवारी केला.
बेकायदा जागेवर मॉल उभारण्यासाठी बच्चन दाम्पत्याने ९ कोटी रुपये रिअल इस्टेट फर्मला दिल्याचा आरोप सिंग यांनी केला. ही रक्कम कर्ज स्वरुपात दिली का, याची माहिती आपल्याकडे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जर बच्चन यांनी संबंधित रक्कम कर्ज म्हणून दिली असेल, तर त्यांनी ती तातडीने परत घ्यावी आणि त्या जागेवर उभारण्यात येत असलेले बांधकाम पाडण्याची मागणी महापालिकेकडे करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
First published on: 30-01-2013 at 05:54 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh and jaya bachchan in trouble over land scam