बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या.
——–
बोफोर्सप्रकरणी माझे नाव गुंतविण्यात आल्याचे दिसताच, माझ्यावर आरोप होत असल्याचे आढळताच त्यांनी मला बोलावले व मला विचारले की, मला खरं काय ते सांग. तुझा त्यात हात आहे का, असे विचारले. मी नाही असे सांगताच त्यांनी भक्कमपणे मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगून तू अभिनेता आहेस, त्यात तू जे तुला मोठे वाटते ते काम कर, असे सांगून ठाम पाठीशी उभे राहिले.
——–
पत्नी जया बच्चन व माझा विवाह झाल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या घरी बोलाविले व आपल्या सुनेचे स्वागत जसे घरात केले जाते तसेच त्यांनी आमचे स्वागत केले व मी त्यांच्या कुटुंबातीलच एक झालो.
——–
कुली चित्रपटातील चित्रीकरणाच्या वेळी झालेल्या अपघातानंतर रुग्णालयात त्यांनी माझी भेट घेतली व एक व्यंगचित्र मला दिले. त्यावर त्यांनी लिहिले होते यमराज हार गया. आज त्यांना भेटलो तेव्हा मलाही त्यांना असेच लिहून द्यायची इच्छा आहे.. अशा शब्दांत अमिताभ बच्चन यांनी आपली भावनिक स्थिती मांडली आहे.    
———
फेसबुक आणि व्हॉट्स अपवर रात्रभर चिंता
१४ नोव्हेंबर..वेळ रात्री सुमारे साडेदहा.हिंदी वृत्तवाहिन्यांवर बाळासाहेबांची प्रकृती खालावत चालत असलेली बातमी झळकली आणि आधीच चिंतेत असलेल्या मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकला. सुरुवातीला मराठी वृत्तवाहिन्यांनी कटाक्षाने ही बातमी टाळली. परंतु नंतर त्यांनीही या बातम्या दाखवायला सुरुवात केली. बातमीची खातरजमा करण्यासाठी मोबाइल खणखणू लागले. एसएमएसवरूनही विचारणा होऊ लागली. अफवांनाही ऊत आला होता. मुंबईबाहेर राहणाऱ्यांनी मुंबईत फोनाफोनी सुरू केली. रात्र वाढत होती परंतु नेमकी बातमी समजत नव्हती. उशिरापर्यत मुंबईकर टीव्हीवर नजरा लावून होते. परदेशात राहणाऱ्या मराठी मंडळींकडून ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून चॅटिंगद्वारे उशिरापर्यंत बाळासाहेबांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस सुरू होती.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा