राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असं वक्तव्य केलं. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. खासदार सुप्रिया सुळेंना पक्षाचं कार्याध्यक्ष केल्यामुळे अजित पवार नाराज असल्याचीही चर्चा केली जाते. याबाबत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना विचारलं असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते.

अमोल कोल्हे म्हणाले, “हा फार मोठ्या स्तरावरचा प्रश्न माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला विचारला आहे. अजित पवारांसारखा सक्षम नेता जेव्हा ही भूमिका मांडतो तेव्हा असं दिसतं की, संघटनेतील कामासाठी त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली असावी. तसं असेल तर सर्व कार्यकर्त्यांना आनंदच आहे.”

Sharad pawar on ajit pawar
Sharad Pawar : “नाद करायचा नाय….”, भरसभेत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा; म्हणाले, “एकदा रस्ता चुकला की…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
devendra fadnavis criticize uddhav thackeray for making video of bag checking
“त्यांच्या आधी माझी बॅग तपासली, केवळ भांडवल…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे

“मी अजित पवारांच्या मागेच बसलो होतो”

“मी अजित पवारांच्या मागेच बसलो होतो. त्यांना असं म्हणायचं असेल की, ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी त्यांना विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं,” असं मत अमोल कोल्हेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “…म्हणून मला विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करा”, शरद पवारांसमोर अजित पवारांनी मांडली व्यथा; म्हणाले…

“कृपया काही वेगळे अर्थ लावू नका”

अजित पवार सुप्रिया सुळेंना कार्यध्यक्ष केल्यानंतर नाराज असल्याच्या चर्चा होतात. याबद्दल विचारलं असता अमोल कोल्हे म्हणाले, “आजच्या अजित पवारांच्या भाषणावेळी मी त्यांच्यामागेच बसलो होतो. त्यावरून मला तरी असं काही जाणवलं नाही. त्यामुळे कृपया काही वेगळे अर्थ लावू नका.”