महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसही त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. हे दोघं एका मंचावर आले आणि मुलाखत घेतली तर काय होऊ शकतं याचा प्रत्यय महाराष्ट्राने घेतला. विशेष म्हणजे यावेळी अमृता फडणवीसांनी राज ठाकरेंची प्रतिमा डॉनसारखी असल्याचं म्हणत ही प्रतिमा तयार केली की तुमच्या कामातून झाली असा थेट प्रश्न विचारला. यावर राज ठाकरेंनीही स्पष्टपणे उत्तर दिलं. ते बुधवारी (२६ एप्रिल) लोकमतने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

अमृता फडणवीस राज ठाकरेंना प्रश्न विचारत म्हणाल्या, “प्रभावी विरोधकाला लोक घाबरतात. मात्र, प्रशासक लोकांना घाबरायला लागतो. राज ठाकरेंची आजही एकदम डॉनसारखी प्रतिमा आहे. म्हणजे चांगल्या डॉनची प्रतिमा आहे. उद्योग क्षेत्र, चित्रपटसृष्टी असो किंवा राजकारणी असो, आजही राज ठाकरेंना घाबरतात. ही प्रतिमा तुम्ही जाणूनबुजून तयार केली की तुमचं व्यक्तिमत्त्व, आंदोलनं, तुमच्यावरील दाखल गुन्हे यामुळे घाबरतात?”

Dombivli Raj Thackeray meeting, Raj Thackeray,
डोंबिवलीत राज ठाकरे यांच्या सभेच्या दिवशी बेशिस्तीने वाहने चालविणाऱ्या १९ वाहनचालकांवर गुन्हे
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
aditya thackeray criticized raj thackeray
“भाजपाचा मुख्यमंत्री बसावा असं स्वप्न बघणारे…”; आदित्य ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका!
raj Thackeray Asilata Raje
Raj Thackeray : स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात आहे राज ठाकरेंची बालमैत्रीण, म्हणाले, “आम्ही शिशूवर्गापासून…”
sada sarvankar marathi news (1)
“उद्धव ठाकरेंसारखा माणूस राजकारणात सापडणार नाही”, सदा सरवणकरांच्या नावाने पोस्ट व्हायरल; स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाले…
Raj Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरेंसमोर दुहेरी आव्हान; अमित ठाकरे विधानसभेत गेल्यामुळं मनसेचं पुनरुज्जीवन होणार?
sada sarvankar marathi news
अमित ठाकरेंचा मार्ग मोकळा? सदा सरवणकरांचे माघारीचे संकेत? म्हणाले, “कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय…”
Devendra Fadnavis on Raj Thackeray
Devendra Fadnavis on Raj Thackeray : राज ठाकरेंना महायुतीत घेणार का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

“डॉन नाही, पण तसा मी ‘नो नॉनसेन्स’वाला माणूस”

या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, “प्रतिमा ही काही तयार केलेली गोष्ट नसते. तयार केलेली गोष्ट ही तात्पुरती असते. मुळात मी तसा असेन. डॉन नाही, पण तसा मी ‘नो नॉनसेन्स’वाला माणूस आहे. मी परखडपणे बोलत असेल, स्पष्टपणे बोलत असेन, पण उद्धटपणे बोलत नाही. मात्र, अनेकदा लोकांना स्पष्टपणा आणि उद्धटपणातील फरक कळत नाही. असं असलं तरी मी स्पष्टपणे बोलतो.”

“मला राग फार पटकन येतो, पण तो राग”

“मला राग फार पटकन येतो, पण तो राग तितक्याच पटकन मावळतोही. मला कित्येकदा आमच्या पक्षातील लोक म्हणतात की, जरा कमी स्पष्ट बोला,” असं राज ठाकरेंनी नमूद केलं.

हेही वाचा : अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “मला जर कुणी…”

अमृता फडणीसांचे प्रश्न, राज ठाकरेंची उत्तरं

यावर अमृता फडणवीसांनी तुम्ही स्पष्ट बोलता असं म्हणाले, मग मी काही लोकांची नावं घेईन त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?

अमृता फडणवीस – एकनाथ शिंदे
राज ठाकरे – जपून राहा

अमृता फडणवीस – देवेंद्र फडणवीस
राज ठाकरे – वरती संबंध नीट ठेवा

अमृता फडणवीस – अजित पवार<br>राज ठाकरे – मला ५ तारखेच्या माझ्या रत्नागिरीतील सभेत सविस्तर बोलायचं आहे. एका वाक्यात बोलायचं नाही, पण अजित पवार बाहेर जेवढं लक्ष देत आहेत तेवढंच त्यांनी काकांकडेही लक्ष द्यावं.

अमृता फडणवीस – उद्धव ठाकरे<br>राज ठाकरे – उद्धव ठाकरेंना काय सांगणार मी, ते स्वयंभू आहेत.

अमृता फडणवीस – आदित्य ठाकरे<br>राज ठाकरे – तेच ते.

यानंतर अमृता फडणवीस राज ठाकरेंना म्हणाल्या, “तुम्ही म्हणालात की देवेंद्र फडणवीसांनी जरा वर लक्ष दिलं पाहिजे, तसं त्यांनी घरीही लक्ष दिलं पाहिजे. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे.” यावर राज ठाकरे म्हणाले, “मला तुमच्या घरच्या प्रश्नांमध्ये आणू नका. मला जेव्हा तुम्ही मुलाखत घेणार हे समजलं…”

हेही वाचा : अमृता फडणवीसांचा अजित पवारांना टोला, म्हणाल्या, “ते लोक खूप ठिकाणी डोळे मारतात, त्यामुळे…”

याचवेळी अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या, “आपल्या घरातील जी परिस्थिती आहे ती प्रत्येक राजकारण्याच्या घरी असते. तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात फिरण्यासाठी, नातेसंबंध दृढ करण्यासाठी, सोबत देण्यासाठी वेळ असतो का? देवेंद्र फडणवीस म्हणतात की, व्यग्र राजकारणी असेच असतात, म्हणून मी तुम्हाला विचारून हे तपासत आहे.”