उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टोला लगावला आहे. अजित पवारांच्या भाजपाबरोबर जाण्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अमृता फडणवीसांनी राजकारणी लोक खूप ठिकाणी डोळे मारतात, अशी प्रतिक्रिया दिली.

अमृता फडणवीस म्हणाल्या, “मला वाटतं महाराष्ट्र असं राज्य आहे जे खूप काही करू शकतं. सध्या खूप काही करतंही आहे. यासाठी जनतेला जो माणूस आणि पक्ष योग्य वाटेल, ते न्याय देऊ शकेल असं वाटेल त्यांनी सत्तेत यावं. तेच आपल्या महाराष्ट्रासाठी चांगलं आहे. तो कुणीही असो. प्रत्येक माणसाने विचार करावा की, तो फक्त प्रगतीसाठीच काम करणार आहे. स्वतःच्या घरासाठी काम करणार नाही.”

Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत काय झाली? हे विधानसभेला…”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
What Devendra Fadnavis Said About Uddhav Thackray?
Devendra Fadnavis : “चंद्रपूरचे आपण सगळेच वाली! कुणीही सुग्रीव नाही, मी कुणासारखा जोक…”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला?
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”
Devendra Fadnavis and sharad pawar
“घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तीचा नामोल्लेख…”, संतोष देशमुख हत्याप्रकरणी शरद पवारांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

हेही वाचा : ते मला म्हणाले की, तू व्होडका पिते का? आणि…”, वाचा महिला नेत्याने युवक काँग्रेस अध्यक्षावर केलेले नेमके आरोप काय?

“मला माहिती नाही की, कोण कोण कुठे कुठे डोळे मारत आहे”

“अजित पवार भाजपाबरोबर येणार की नाही ते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाच माहिती असणार आहे. राजकारण्यांची खूप लोकांशी जवळीक असते. ते लोक खूप ठिकाणी डोळे मारतात. त्यामुळे मला माहिती नाही की, कोण कोण कुठे कुठे डोळे मारत आहे,” असं म्हणत अमृता फडणवीस यांनी अजित पवारांना टोला लगावला.

उद्धव ठाकरे अर्थसंकल्पावर बोलत असताना अजित पवारांनी मारला डोळा

दरम्यान, शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांच्या बाजूला विरोधी पक्षनेते अजित पवार उभे होते. तसेच, महाविकास आघाडीतील अन्यही नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे अर्थसंकल्पावर बोलत असताना अजित पवार कुणाला तरी डोळा मारताना दिसले होते. त्यानंतर अजित पवारांनी नेमका कुणाला मारला डोळा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

Story img Loader