मुंबई: मालाड पोलिसांच्या हद्दीत दुधाचे ट्रे उतरवण्याऱ्यावरून झालेल्या वादातून २४ वर्षीय तरूणाच्या डोक्यात लोखंडी सळी मारून हत्या करण्यात आली. याप्रकरणी मालाड पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल करून दिनेश रामदेव यादव (३९) याला अटक केली. आरोपीने गुन्ह्यांत वापरलेली लोखंडी सळी पोलिसांनी हस्तगत केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बासरी हिल परिसरातील दुध केंद्रावर हा घडला. विक्रमकुमार रमेशचंद्र यादव(२४) असे मृत तरूणाचे नाव असून तो कांदिवली पश्चिम येथील चारकोप परिसरातील रहिवासी आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुध केंद्रावर दूध उतरवण्यावरून झालेल्या वादातून दिनेश यादव याने दुधाचे ट्रे खेचण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी सळी विक्रमकुमारच्या डोक्यावर मारली. त्यात विक्रमकुमारच्या डोक्याला डाव्या बाजूला जोरदार फटका बसल्यामुळे तो खाली कोसळला. त्याला बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी विक्रमकुमारला मृत घोषित केले.

हेही वाचा… पंतप्रधान आवास योजना गोरेगाव पहाडीतील घरांच्या ताबा प्रक्रियेस सुरुवात

याप्रकरणी विक्रमकुमारचा भाऊ समरबहादूर यादव (२३) याच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी दिनेश यादव याला अटक करण्यात आली. आरोपीने गुन्ह्यांत वापरलेली लोखंडी सळी जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An accused arrested for murdering a 24 year old youth with an iron rod due to a dispute over a milk tray unloader in malad mumbai print news dvr
Show comments