मुंबई: सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत तस्करांना मदत करणाऱ्या विमानतळ कर्मचाऱ्याला मंगळवारी अटक करण्यात आली. आरोपीकडून ३३ सोन्याचे लगड जप्त करण्यात आले असून त्याचे वजन सुमारे पावणेचार किलो आहे. याप्रकरणी जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सव्वादोन कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी कर्मचाऱ्याने गेल्या १५ दिवसांमध्ये किमान १० वेळा सोन्याच्या तस्करीत मदत केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

सीमाशुल्क विभागाने संशयाच्या आधारावर विमानतळार काम करणाऱ्या अक्षय कुळे याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे काळ्या रंगाच्या पाकिटामध्ये काही वस्तू सापडली. ते पाकिट पाहिले असता त्यात दोन मोबाइल कव्हरमध्ये अनुक्रमे १७ व १६ पिवळ्या रंगाचे धातू साडले. तपासणीत ते सोने असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी कुळे याच्याकडे सोन्याच्या एकूण ३३ लगड सापडल्या असून त्याचे वजन तीन हजार ८४५ ग्रॅम आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत दोन कोटी १४ लाख रुपये आहे. याप्रकरणी सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अक्षयला अटक करण्यात आली.

Father and son imprisonment, imprisonment beat police,
मुंबई : कर्तव्या बजावणाऱ्या पोलिसांना मारहाण करणे महागात, पिता-पुत्राला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Indian Airlines Bomb Threat
Indian Airlines : तीन दिवसांत १२ विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी; केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणाले, “विघ्नकारी कृत्यांमुळे चिंता”
FASTAG, road tax Mumbai, traffic jam Mumbai,
दुसऱ्या दिवशीही पथकराचा गोंधळ कायम, फास्टॅगमधून पैसे कापल्याचे संदेश, मार्गिकांच्या गोंधळामुळे वाहतूक कोंडी
Gang rape in Bopdev Ghat triggers safety concerns
असुरक्षित टेकड्या; भयभीत पुणेकर
Rumors of bombs on planes due to a minor boy tweet Mumbai
अल्पवयीन मुलाच्या ‘ट्वीट’मुळे विमानांमध्ये बॉम्बची अफवा; मित्राला गुन्ह्यात अडकविण्यासाठी खोटा संदेश केल्याचे उघड
Prime Minister Narendra Modi with Israeli counterpart Benjamin Netanyahu
Israel Attack : इस्रायल- लेबनॉनदरम्यान वाढत्या संघर्षावर मोदींचा थेट बिन्यामिन नेतान्याहू यांना फोन; म्हणाले, “जगात…”
The Lok Adalat ordered Rs 4 crore compensation for bike riders family after collision
अपघातात मृत पावलेल्या दुचाकीस्वाराच्या कुटूंबियांना साडेचार कोटींची नुकसान भरपाई, मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे आदेश

हेही वाचा… वर्षाअखेरीस मुंबई-जालना वंदे भारत सुरू होणार

आरोपी विरार पूर्व येथील मनवेलपाडा परिसरातील रहिवासी आहे. चौकशीत आरोपीने १५ दिवसांमध्ये किमान १० वेळा अशा पद्धतीने सोन्याच्या तस्करीत मदत केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचा संशय आहे. याप्रकरणामध्ये अन्य कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे का? याबाबत सीमाशुल्क विभाग तपास करीत आहे. तसेच आरोपी विमानतळावर कोणकोणत्या विभागात कार्यरत होता, याबाबतची माहिती घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.