लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : भांडुप परिसरात नाकाबंदी सुरु असताना पोलिसांना एका एटीएमकडे रोकड घेऊन जाणाऱ्या गाडीत तीन कोटींची रक्कम आढळली आहे. देशात लोकसभा निवडणुकांचे वातावरण तापलेले असताना अनेक ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी सुरू आहे.

आणखी वाचा-“अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू…”, ना.म.जोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवारी मध्यरात्री भांडुप पोलिसांकडून सोनापूर परिसरात नाकाबंदी सुरू होती. त्यावेळी एटीएममध्ये पैसे घेऊन जाणारी एका गाडी आली. त्या गाडीत केवळ चालक आणि सुरक्षा रक्षक असल्याने पोलिसांना गाडीबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी ही गाडी थांबवून तपासणी केली असता, त्यात पोलिसांना तीन कोटींची रक्कम आढळली. सध्या ती गाडी भांडुप पोलिसांनी अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतली असून भांडुप पोलीस, आयकर विभाग आणि निवडणूक अधिकारी याबाबत अधिक तपास करत आहेत.