लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : रुपेरी पडद्यावर अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रांवर प्रचंड हुकूमत असलेले प्रतिभावंत कलाकार अमोल पालेकर यांच्या व्यक्तित्वातील आणखी एका पैलूबद्दल दीर्घकाळ त्यांचे चाहते अनभिज्ञ आहेत. अभिनयाने व्यक्तिरेखेत रंग भरणारे अमोल पालेकर कॅनव्हासवर कुंचल्यातून रंगाचे फटकारे मारत त्यातून उमटणाऱ्या अमूर्त चित्रांमध्ये मनापासून रमतात. ‘थ्रू द रॅडियन्स’ या शीर्षकांतर्गत त्यांच्या ५० तैलचित्रांचे प्रदर्शन १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आले असून त्यांच्यातील चित्रकाराची ओळख या प्रदर्शनाच्या माध्यमातून करून घेता येणार आहे.

sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
we the documentary maker Dheeraj akolkar
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: आनंददायी दृश्य-व्यायाम
Gaitonde
कलाकारण: बाजारप्रणीत इतिहासाच्या पलीकडले गायतोंडे
Suraj Chavan
गळ्यात हार घातला, पाया पडला, डोक्यावरून हात फिरवत सूरज चव्हाणने रूद्राप्रति ‘अशी’ केली कृतज्ञता व्यक्त; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा-पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदार नोंदणीचा कालावधी वाढवावा, मंगल प्रभात लोढा यांची मागणी

अभिनेता म्हणून एक काळ गाजवणारे अमोल पालेकर हे मुळात जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी. चित्रकलेचे शास्त्रशुध्द शिक्षण घेतल्यानंतर अमोल पालेकर यांनी सुरुवातीच्या काळात त्यांच्या चित्रांची अनेक प्रदर्शने भरवली होती. प्रसिध्द चित्रकार एम. एफ. हुसैन हेही त्यांच्या चित्रकारितेतील कौशल्याविषयी जाणून होते. ‘मी अपघाताने अभिनय क्षेत्रात आलो’ असे म्हणणारे अमोल पालेकर आपल्या अभिनयातील अदाकारी आणि त्याला मिळालेले यश याचा झाकोळ आपल्यातील चित्रकारावर कायम राहिला, ही मनातील खंतही बोलून दाखवतात. अन्य कलांप्रमाणे चित्रकलेत आपण सोडून इतर कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही, त्यामुळे या स्वयंसिध्द कलेत समरसून जाणे सोपे होते आणि आवडतेही, असे ते म्हणतात.

आणखी वाचा-मुंबईतील ३५० बसगाडय़ांवर हवा शुद्धीकरण यंत्रे; पालिकेचा निर्णय, आणखी सहा उपाययोजना

चित्रकार म्हणून अमूर्ताच्या शोधातील रंगाविष्कार त्यांना अधिक भावतो. अमूर्त चित्रकलेतही पाहणाऱ्याशी संवाद साधण्याची ताकद असते, मात्र अमूर्त म्हणजे काही तरी अवघड, अनाकलनीय असे ठोकताळे बांधून आपण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो, या वास्तवाकडे लक्ष वेधत मनातील सगळे पूर्वग्रह बाजूला सारून आपल्या अमूर्त चित्रशैलीची अनुभूती घेण्याचे आवाहन पालेकर यांनी केले आहे. ‘थ्रू द रॅडियन्स’ हे त्यांचे तैलचित्र प्रदर्शन मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरवण्यात येणार आहे. या चित्रप्रदर्शनाच्या निमित्ताने दृश्यकला आणि चित्रांबद्दल गप्पा मारण्यास आपण उत्सूक आहोत, असेही पालेकर यांनी सांगितले आहे.