महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आणि उद्योगक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच विविध कल्पना शेअर करत त्याचं कौतुक करताना पाहायला मिळतात. यावेळी आनंद महिंद्रा यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतील बसस्टॉपचा कायापालट केल्याबद्दल आनंद महिंद्र यांनी ट्विटच्या माध्यमातून मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचेही कौतुक केले आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आनंद महिंद्रा यांच्या ट्विटला प्रतिसाद देत आभार मानले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“अखेर मुंबईत वर्ल्डक्लास बस स्टॉप पाहायला मिळणार आहेत. एक्सरसाईझ बार थंड हिरवेगार छत यासारखी नाविन्यपूर्ण गुणवैशिष्ट्ये पाहून खूप चांगलं वाटत आहे. वाह! आदित्य ठाकरे, इक्बाल सिंह चहल,” असे आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आनंद महिंद्रा यांचे आभार मानले आहेत. “धन्यवाद आनंद महिंद्राजी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आरामदायी आणि डिझाइन दर्जेदार करणे ही त्यामागील कल्पना आहे. त्यामुळे आम्ही एसी इलेक्ट्रिक बसची वारंवारिता वाढवली आहे. दुसरीकडे आम्ही आमचे बस स्टॉप्स नागरिकांसाठी सर्वोत्तम असतील याकडे लक्ष ठेवत आहोत,” असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

मात्र आनंद महिंद्रांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. एका युजरने एक्सरसाइज बार पट्टी ‘कूल’ आहे पण ग्रीन रुफ असण्यास मी सहमत नाही. त्यामध्ये पाणी कोण टाकणार आणि त्याची देखभाल कोण करणार? त्याऐवजी, आपण छतावर सोलार पॅनेल बसवल्यास, ते इलेक्ट्रिक बिलबोर्ड चालविण्यासाठी वीज निर्माण करू शकतात आणि अशा प्रकारे अतिरिक्त महसूल मिळवू शकते. तर दुसऱ्या एका युजरने हा चांगला उपक्रम आहे पण गंमत अशी आहे की नागरिक या सुविधांचा जबाबदारीने वापर करत नाहीत. उदघाटनाच्या काही तासांनंतर फार काळ चालणार नाही. कोणीतरी ती गोष्ट तोडलेली चोरलेली किंवा घाणेरडी केलेली दिसेल, असे म्हटले आ