राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आनंद परांजपे यांच्या येथील औद्योगिक क्षेत्र परिसरातील कार्यालयाबाहेर सोमवारी दुपारी पोलिसांनी प्रचारसाहित्य व एक लाख २१ हजार रुपये जप्त केले.
परांजपे यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर रिक्षाचालकांना पैसे व प्रचारसाहित्याचे वाटप होत असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना दूरध्वनीद्वारे एका  व्यक्तीने दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता तेथे रिक्षा चालकांना परांजपे यांचे प्रचारसाहित्य व पैशाची पाकिटे वाटप केल्याचे आढळले. याप्रकरणी पोलिसांनी नाझीर खान, मुकेश चित्ते, प्रशांत बागूल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

६ ते २२ एप्रिलपर्यंत प्रत्येक प्रभागात रिक्षेद्वारे प्रचार सुरू होणार आहे. रिक्षेवर माझी स्टिकर लावण्यात येणार आहेत. हा सगळा खर्च मी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर निवडणूक खर्चात दाखवणार आहे. रिक्षा चालकांना पेट्रोलसाठी पैसे देण्यात आले. असे असताना पोलिसांनी ही कारवाई केली.
– आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे उमेदवार