भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा १२ जुलै रोजी विवाह सोहळा पार पडणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे दोघे १२ जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्याची गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा चालू आहे. लग्न समारंभाच्या आधी नुकताच या दोघांचा हळदी समारंभ अंबानींच्या राहत्या घरी म्हणजेच अँटालिया बंगल्यावर पार पडला.

आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना लक्झरी ट्रीटमेंट मिळणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्यासाठी शुक्रवारी मुंबईत येणाऱ्या पाहुण्यांना आणण्यासाठी अंबानी कुटुंबाकडून तीन फाल्कन-२००० जेट भाड्याने घेण्यात आले आहे, असं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पारंपारिक हिंदू पद्धतीने पार पडणार आहे. शुक्रवारी १२ जुलै रोजी अनंत-राधिका सात फेरे घेणार आहेत. शनिवारी १३ जुलैला नवीन जोडप्याला शुभाशीर्वाद देण्याचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर रविवारी १४ जुलैला लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. या संपूर्ण सोहळ्यासाठी बॉलीवूडसह राजकीय क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावणार आहेत.

हेही वाचा : मुकेश अंबानींनी ‘या’ मराठी अभिनेत्याला दिली मुलाच्या लग्नाची पत्रिका, फोटो शेअर करत म्हणाला, “आता जावं लागेल लग्नाला…”

दरम्यान, रॉयटर्सच्या वृत्तानुसार, क्लब वन एअरचे सीईओ राजन मेहरा यांनी सांगितलं की, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना येण्यासाठी आणि जाण्यासाठी तीन फाल्कन -२००० जेट भाड्याने घेतली आहेत. तसेच लग्नाच्या उत्सवादरम्यान १०० हून अधिक खासगी विमाने वापरण्यात येण्याची शक्यता आहे.

भारतासह जगभरातील सेलिब्रेटी, कलाकार, खेळाडू, उद्योगपती आणि राजकारणी या लग्नाला येणार आहेत. त्यामुळे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलांमधील पाहुण्यांची संख्या वाढली आहे. या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी मुकेश अंबानी यांनी मुंबई विमानतळाच्या आसपास आणि वांद्रे कुर्ला संकुलातील अनेक पंचतारांकित हॉटेलांमध्ये बुकिंग करून ठेवल्याचंही बोललं जात आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या हळदी समारंभाच्या कार्यक्रमाला सलमान खान, रणवीर सिंह, अर्जुन कपूर, सारा अली खान, जान्हवी कपूर, शिखर पहारिया, अनन्या पांडे, गायक राहुल वैद्य, मानुषी छिल्लर, वेदांग रैना, ओरी, खुशी कपूर, बोनी कपूर यांनी हजेरी लावली होती. हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर हे सेलिब्रिटी हळदीने माखलेले अँटिलियामधून बाहेर पडताना दिसले होते.

Story img Loader