अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. न्यायालयाने महापालिकेला राजीनामा स्वीकारण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, शिंदे गट (बाळासाहेबांची शिवसेना) ही निवडणूक लढणार नाही यावर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली असून ही लढाई भाजपा विरुद्ध ठाकरे गट असणार आहे. ‘एबीपी माझा’शी बोलताना मुरजी पटेल यांनी आपण महायुतीचे उमेदवार असल्याचं म्हटलं आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने मी आज अर्ज भरण्यासाठी चाललो आहे. अंधेरी आमचा एक परिवार आहे, येथे सर्वधर्मीय लोक राहतात. अंधेरीची जनता आम्हाला पूर्ण बहुमताने निवडून देईल,” असा विश्वास मुरजी पटेल यांनी व्यक्त केला आहे.

shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

Shinde vs Thackeray: शरद पवारांसमोरच उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला जाहीर आव्हान, मंचावरुनच म्हणाले “हिंमत असेल तर एका…”

“मी भाजपाचा कार्यकर्ता आहे. पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य आहे. पक्षाने मला निवडणूक लढवण्यास सांगितल्याने मी मैदानात उतरलो आहे. आमच्याबरोबर खऱी शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे आहेत. रामदास आठवले यांचा आरपीआय गटही आमच्यासोबत आहे. महायुती म्हणून आम्ही निवडणुकिच्या रिंगणात उतरणार आहोत,” असंही त्यांनी सांगितलं.

Andheri By Election: ऋतुजा लटके यांच्याबाबतीत भेदभाव का? मुंबई हायकोर्टाने खडसावलं, पालिका म्हणाली “आम्ही आदेश देतो, पण…”

“गेल्या २०-२२ वर्षांपासून अंधेरी पूर्व परिवाराची मी सेवा करत आहे. विकास झाला पाहिजे असं लोकांना वाटत आहे. आमच्याकडे एकही सरकारी रुग्णालयात नाही. नेहमी होणारी वाहतूक कोंडी आम्ही सोडवणार आहोत. अंधेरी हे औद्योगिक केंद्र आहे. अंधेरीतून सर्वात जास्त कर जातो. अंधेरीतील तरुणांना आम्ही रोजगार देणार आहोत. आमचे प्रत्येकाशी संबंध आहेत. अंधेरीत इतिहास घडणार हे नक्की,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अंधेरी निवडणूक भाजपा लढणारी की शिंदे गट याबाबत संभ्रम होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री उशिरा चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती होती. पण आता मुरजी पटेल हेच निवडणूक लढणार असल्याचं नक्की झालं आहे.

Story img Loader