अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाविरोधात सुरु असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटाने या निवडणुकीत उमेदवार न देता, भाजपाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे ही अप्रत्यक्षपणे ठाकरे आणि शिंदे गटातील लढाई होती. पण भाजपाने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतल्याने ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार, ऋतुजा लटकेंचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा

“जनमताचा आदर ठेवत पोटनिवडणूक दीड वर्षांसाठीच असल्याने तसंच सर्वांनी आग्रह केल्याने निवडणुकीतून माघार घेतली आहे. स्वर्गीय लटकेंच्या सौभाग्यवतींना बिनविरोध निवडून आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,” असं गुलाबराव पाटील म्हणाले.

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “इतका आडमुठेपणा…”

दरम्यान यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना कोर्टाते गेले, इतका संघर्ष केला याची आठवण करुन दिली असता त्यांनी संतापून ‘म्हणून मी बोलत नाही, याला काय अर्थ आहे. माघार घेतली म्हणजे सगळं संपलं,’ असं उत्तर दिलं.

नेमकं काय झालं?

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. ते म्हणाले “५१ टक्के आम्ही ती लढाई जिंकलोच असतो. आमची पूर्ण तयारी झाली होती. आम्ही रणांगणात असून, वॉर्डात जुळवाजुळव झाली होती. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आम्ही १०० टक्के निवडणूक जिंकणार होतो. पुढील निवडणुकीला एकच वर्ष शिल्लक आहे हा विचारही करण्यात आला. यापूर्वी भाजपाने अनेकदा असा निर्णय घेतलाआहे. ही संस्कृती आजची नसून अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून अनेक उदाहरणं आहेत”.

मुरजी पटेल अपक्ष लढतील का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “मुरजी पटेल अपक्ष लढणार नाहीत. एकदा भाजपाचा उमेदवार होतो तो पक्षाच्या निर्णयाविरोधात जात नाही. ते भाजपाचे आणि युतीचे उमेदवार होते. त्यांच्यासंबंधी ही शंका घेण्याची गरज नाही”.