Andheri East Bypoll News Updates : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीसह भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने पक्षचिन्ह मिळूनही उमेदवार उभा केला नाही. या ठिकाणी भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली. ऋतुजा लटकेंचा राजीनाम स्वीकारण्यास नकार दिल्याने काही काळ त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. मात्र, उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला फटकारल्यानंतर त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. आता आज (१४ ऑक्टोबर) अर्ज करण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या राजकीय घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Andheri East Bypoll Election Updates News : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या राजकीय घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स…
केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी आज(शुक्रवार) दक्षिण मुंबईत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपाने आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी सुरू केलेल्या ‘लोकसभा प्रवास’ या संकल्पनेबाबत माहिती दिली. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचीही उपस्थिती होती. वाचा सविस्तर बातमी…
भाजपा नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज(शुक्रवार) दक्षिण मुंबईत पत्रकारपरिषदेत बोलताना शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शिवाय, सध्या राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेचा विषय असलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणेंनी रमेश लटकेंचा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंकडून अपमान झाला होता, असे म्हटले आहे. यावरही नारायण राणेंनी मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. याप्रसंगी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचीही उपस्थिती होती. वाचा सविस्तर बातमी…
अनिल परब म्हणाले, “हा नियमच असतो. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांनी अर्ज केला. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे दोन उमेदवारांची नावं दिली जातात. पहिल्या उमेदवाराचा अर्ज काही कारणाने रद्द झाला, तर शिवसेनेच्या दुसऱ्या नावाला अधिकृत उमेदवार समजलं जातं. म्हणून शिवसेनेने संदीप नाईक यांची उमेदवारी भरली आहे. परंतु उद्या ऋतुजा लटके यांचा अर्ज पडताळणीत अर्ज योग्य ठरेल, तेव्हा नाईक यांचा अर्ज ताबोडतोब मागे घेतला जाईल.”
ठाकरे गटाकडून सावध भूमिका, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंशिवाय संदीप नाईक यांचाही उमेदवारी अर्ज दाखल
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवार अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवार नसणार आहे. तर शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यांच्याविरोधात भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली असून ही लढाई भाजपा विरुद्ध ठाकरे गट असणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आज(शुक्रवार) दादर येथे प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर बातमी…
अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके निवडून येतील. आम्ही बिनविरोध करण्यासाठी आवाहन केले होते. मात्र, निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत आणि मोठ्या मताधिक्याने जिंकू, असा विश्वास माजी मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दोन्ही गटाकडून टीका-टीप्पणी करण्यात येत आहे. दरम्यान, आज दोन्ही उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर भाजपा-शिंदे गट आणि महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी ही निवडणूक ‘माणुसकी विरुद्ध खोकासूर’ अशी असल्याचे विधान केले होते. त्याला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सविस्तर…
राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवार अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवार नसणार आहे. तर शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यांच्याविरोधात भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली असून ही लढाई भाजपा विरुद्ध ठाकरे गट असणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आज(शुक्रवार) दादर येथे प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. वाचा सविस्तर बातमी…
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गट आणि सत्ताधारी आमने-सामने असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी जास्त म्याव म्याव केलं, तर ते बंद करण्याची सर्व औषधं माझ्याकडे आहेत असा इशारा त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना दिला आहे. तसंच उद्धव ठाकरे यांनी रमेश लटके यांना जिवंतपणी त्रास दिल्याचा गंभीर आरोपही केला आहे.
रमेश लटके आज जिवंत असते तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत उभे असते असा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित रॅलीत ते सहभागी झाले होते यावेळी ‘एबीपी माझा’शी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. मातोश्रीवर त्यांचा अपमान झाला होता. याबद्दल त्यांनीच मला सांगितलं होतं असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
आम्ही कोल्हापुरात एकत्र लढलो आणि जिंकलो, मुंबईतही आम्ही तसंच करणार आहोत आणि येथेही जिंकू. मुरजी पटेल कोण आहे? मी ओळखत नाही – भाई जगताप
देशात आज सरकारी यंत्रणांचा गैरवापर होतो आहे. त्याचाच भाग म्हणजे ऋतुजा लटकेंचा राजीनामा लटकवण्याचा प्रयत्न झाला. परंतु, शेवटी उच्च न्यायालयाने यावर निकाल दिला. ऋतुजा लटके आज उमदेवारी अर्ज भरतील. मतदारसंघातलं वातावरण पाहिलं तर ऋतुजा लटके विजयी होतील यात कुठलीच शंका नाही – दिलीप वळसे पाटील
निवडणुकीत दोन किंवा दोनपेक्षा अधिक उमेदवार नेहमीच असतात. यावेळी या निवडणुकीत भाजपा विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना होतो आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांच्या माध्यमातून आम्ही संयुक्त उमेदवार दिला आहे. त्या उमेदवाराच्या विजयासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत. आमचा उमेदवार निवडून येईल, अशी आम्हाला खात्री आहे – दिलीप वळसे पाटील
आमचा उमेदवार ६५ टक्के मतं घेऊन निवडून येईल. भाजपाला कोणी सांगितलं की ऋतुजा लटके यांना सहानुभूती नाहीये. एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला सहानुभूतीची मतं मिळतात हेही त्यांना कळत नसेल, तेवढीही अक्कल नसेल, तर त्यांना बोलण्यात काही अर्थ नाही. बिनविरोध तर सोडाच, पण भाजपा आणि शिंदे गटाने ऋतुजा लटकेंना अनेक अडचणी निर्माण केल्या – रविंद्र वायकर, आमदार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
भाजपा आणि शिंदे गटाच्या नेत्यांच्या उपस्थितीत मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल, जोरदार शक्तिप्रदर्शन, आमचाच विजय होणार असा विश्वास व्यक्त
आमचे उमेदवार मुरजी पटेल देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात २५ हजार मताधिक्याने विजयी होतील. आदित्य ठाकरेंना विनंती आहे की, त्यांनी आणखी एकदा निवडणूक आयोगाकडे जावं, आणखी एकदा पक्षाचं नाव बदलून घ्या. तसेच त्यांच्या पक्षाचं नाव रडकी सेना असं करा. सत्तेत होता तेव्हा केंद्राच्या नावाने रडले. विरोधी पक्षात आल्यावर न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या नावाने रडत आहेत – आशिष शेलार
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने-सामने आहेत. शिंदे गटाने आपला उमेदवार दिलेला नसला तरी भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या रॅलीत सहभागी होत पाठिंबा दर्शवला आहे. अर्ज भरण्याआधी ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांच्याकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येत असून समर्थनासाठी मोठे नेते सहभागी झाले आहेत. आदित्य ठाकरेदेखील ऋतुजा लटकेंना समर्थन देण्यासाठी रॅलीत सहभागी झाले असून शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘एबीपी माझा’शी बोलताना आदित्य ठाकरे यांनी ही ‘माणुसकी विरुद्ध खोकासूर’ अशी लढाई असल्याचं सांगितलं आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. न्यायालयाने महापालिकेला राजीनामा स्वीकारण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, शिंदे गट (बाळासाहेबांची शिवसेना) ही निवडणूक लढणार नाही यावर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली असून ही लढाई भाजपा विरुद्ध ठाकरे गट असणार आहे. ‘एबीपी माझा’शी बोलताना मुरजी पटेल यांनी आपण महायुतीचे उमेदवार असल्याचं म्हटलं आहे.
rutuja latke resignation: अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या ३ नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेने स्वीकारला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राजीनामा स्वीकृती पत्र पालिकेने लटके यांना दिलं आहे. त्यामुळे आज लटके यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. आज दुपारी १२ च्या आसपास लटके या आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.