अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून उमेदवारांना टपाली मतपत्रिका (पोस्टल) आणि ‘ईव्हीएम’ याद्वारे मिळालेली एकत्रित अंतिम मते जाहीर करण्यात आली आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना सर्वाधिक ६६ हजार ५३० मते मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकाची मते अपेक्षेप्रमाणे नोटा या पर्यायाला मिळाली असून १२ हजार ८०६ मतदारांनी नोटाचे बटण दाबले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – Andheri Bypoll Election Result 2022 : अंधेरी पोटनिवडणुकीतील विजयानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Action will be taken against employees who refuse election work
निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Challenge for Kiran Samant from Rajapur Assembly Election Constituency print politics news
लक्षवेधी लढत: राजापूर : उदय सामंत यांच्या भावासमोर कडवे आव्हान
Vote and get discount on hotel bill 10 percent discount on payment of voters on behalf of Pune Hotel Association
मतदान करा अन् बिलात सवलत मिळवा! पुणे हॉटेल संघटनेच्यावतीने मतदारांच्या देयकावर १० टक्के सूट
Vote Karega Kulaba campaign to increase voter turnout print politics news
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ‘व्होट करेगा कुलाबा’ मोहीम; सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, निवृत्त अधिकाऱ्यांचा पुढाकार
Rajan Vikhare, demands CCTV system
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा बसवा, ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांची मागणी
Jharkhand campaign trail
आश्वासनं देण्याची चढाओढ, झारखंडमझ्ये भाजपा-इंडिया आघाडीत वेगळीच स्पर्धा!
thackeray shiv sena break in panvel
पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत फूट

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या सर्व १९ फेऱ्याची अंतिम मतमोजणी पूर्ण झाली असून टपालाने आलेली मतेदेखील मोजण्यात आली आहेत. अंतिम निकाल जाहीर झाला असून ऋतुजा लटके यांना ६६ हजाराहून अधिक मते मिळाली आहेत. या निवडणुकीत भाजपने माघार घेतली होती. मात्र अनेक ठिकाणी मतदारांना नोटाचा पर्याय स्वीकारण्यासाठी पैसे देऊन आवाहन केले जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. तशा लेखी तक्रारी देखील निवडणूक विभागाकडे व पोलिसांकडे केल्या होत्या. या निवडणुकीत शिवसेनेला कोणताही मोठा प्रतिस्पर्धी नव्हता पण नोटा या पर्यायाशी सामना करावा लागणार होता हे निश्चित झाले होते. लटके यांचा विजय नक्की मानला जात असला तरी किती मतदार नोटाचा पर्याय स्वीकारतात याबाबत उत्सुकता होती. त्यानुसार या निवडणुकीत अन्य सहा उमेदवारांना मागे टाकून दुसऱ्या क्रमांकाची मते नोटाला मिळाली आहेत.

१४ टक्के मतदान ‘नोटा’ला –

या निवडणुकीत एकूण ८६ हजार ५७० मतदारांनी मतदान केले असून त्यापैकी १४ टक्के मते ही नोटा या पर्यायाला आहेत. तर ७६ टक्के मते ऋतुजा लटके यांना मिळाली आहेत. जेवढे मतदान होईल त्यापैकी ९८ टक्के मते लटके यांना मिळतील असा शिवसेनेला विश्वास होता मात्र अपेक्षेपेक्षा कमी मते लटके यांना मिळाली आहेत. मात्र दुसरीकडे शिवसैनिकांनी मात्र नोटाची मते ही भाजपची मते असल्याचे सांगून भाजपला १२ हजारच मते मिळाल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवरून व्यक्त केल्या आहेत.

Andheri East Bypoll Election Result : ‘मी नाही खाणार आणि तुला पण नाय खाऊ देणार…’; मनसे नेते वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

काँग्रेसची मते कुठे गेली? –

दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी रमेश लटके यांना ६२,७७३ मते मिळाली होती. यावेळी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिलेला असतानाही लटके यांच्या मतांमध्ये फार मोठा फरक पडला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या मतांचा शिवसेनेला फार लाभ झालेला दिसला नाही.

अंतिम मतमोजणी –

ऋतुजा लटके: ६६५३०, बाला नाडार : १५१५, मनोज नायक : ९००, नीना खेडेकर : १५३१, फरहाना सय्यद : १०९३, मिलिंद कांबळे : ६२४, राजेश त्रिपाठी : १५७१, नोटा : १२८०६ आणि एकूण मते : ८६५७०