भाजपच्या माघारीनंतर एकतर्फी झालेल्या अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला. त्यांना सर्वाधिक ६६ हजार ५३० मते मिळाली. मात्र दुसऱ्या क्रमांकाची मते नोटा या पर्यायाला मिळाल्याचे दिसून आले तब्बल १२ हजार ८०६ मतदारांनी नोटाचे बटण दाबले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. यावरून विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. कारण, नोटाचा पर्याय स्वीकारावा म्हणून मतदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला होता. दरम्यान अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Andheri Bypoll Election Result 2022 : ऋतुजा लटके ६६ हजारांहून अधिक मते मिळवत विजयी; ‘नोटा’ला दुसऱ्या क्रमांकाची मते

आशिष शेलार म्हणाले, ‘अंधेरीत जे झाले ते बरे झाले, भाजपासाठी मुंबई महापालिका विजयाचे चित्र स्पष्ट झाले. २०१४ नुसार विचार केला तर आघाडीच्या उमेदवारांना ९० हजार मते मिळायला हवी होती तसे घडले नाही. एक पक्ष दुसऱ्या पक्षाला मतदान करीत नाही. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला मुंबईकरांचा मतदान करायलाही विरोध आणि मतपेटीतूनही प्रचंड विरोध आणि रोष समोर आला आहे. ’

याशिवाय, ‘अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीने बरेच काही स्पष्ट केले आहे. भाजपासमोर आघाडीचे सोळा झाले गोळा तरी भाजपा शिवाय जिंकता येणार नाही. मतदानाची अत्यल्प टक्केवारी आणि नोटा यातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटावरचा मुंबईकरांचा रोष समोर आला आहे. या तिघाडीला ७० टक्के मतदारांनी नाकारले आहे. ’ असंही शेलार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – Andheri Bypoll Election Result 2022 : अंधेरी पोटनिवडणुकीतील विजयानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

विधानसभा निवडणुकांमध्ये देशात लातूर ग्रामीणचा ‘नोटा’चा विक्रम मानला जातो. त्यापाठोपाठ राज्यात अंधेरीमधील मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेच्या विजयी उमेदवार लटके यांना ६६,५३० मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर नोटाला १२,८०६ मतदारांनी पसंती दिली.

Andheri East Bypoll Election Result : ‘मी नाही खाणार आणि तुला पण नाय खाऊ देणार…’; मनसे नेते वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

राज्यात लातूर ग्रामीण मतदारसंघात २०१९च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक २७,५०० मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला होता. देशात विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक नोटाला मते लातूर ग्रामीणमध्ये मिळाली होती. या मतदारसंघातून काँग्रेसचे धीरज विलासराव देशमुख विजयी झाले व त्यांना १ लाख ३५ हजार मते मिळाली होती. त्यानंतर नोटाला मतदारांनी पसंती दिली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andheri bypoll election result what happened in andheri is good the picture of mumbai municipal victory for bjp is clear ashish shelar msr
Show comments