अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख असून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतूजा लटके तर भारतीय जनता पार्टीकडून मुरजी पटेल अर्ज भरणार आहेत. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळेच आज अर्ज सादर करण्याच्यानिमित्ताने दोन्ही बाजूने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. अनेक मोठे नेते आज अंधेरीमधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित आहेत. याचदरम्यान या नेत्यांकडे विरोधकांवर टीका टीप्पणी केली जात असतानाच भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला लक्ष्य करताना त्यांच्या नव्या निवडणूक चिन्हावरुन म्हणजेच ‘मशाली’संदर्भात भाष्य केलं आहे.

नक्की वाचा >> ‘भाजपाची ढाल अन् गद्दारांची तलवार’ टीकेवरुन फडणवीस संतापले; ठाकरे गटाला लक्ष्य करत म्हणाले, “याहून मोठी गद्दारीच…”

प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरेंच्या गटाला देण्यात आलेल्या नव्या चिन्हासंदर्भात नितेश राणेंना प्रश्न विचारला असता त्यांनी ही मशाल नसून आईस्क्रीमचा कोन असल्याचा टोला लगावला. तसेच हे चिन्ह उद्धव ठाकरेंना का देण्यात आलं यासंदर्भातील कारणही त्यांनी सांगितलं. “उद्धव ठाकरे या माणसाचं चिन्ह हे मशाल नाही कारण त्याच्यातली आग कधीच विझली आहे. खरं तर आईस्क्रीमचा कोन मिळाला आहे जो थंड पडलेला आहे,” असं नितेश राणे म्हणाले. “मशाल नाहीच आहे की आइस्क्रीमचा कोन आहे. उद्धव ठाकरेचं मशाल हे चिन्ह होऊच शकत नाही. त्या माणसामधली आग संपलेली आहे,” असंही नितेश राणेंनी म्हटलं.

Uddhav Thackeray on Gadgebaba
Uddhav Thackeray : “संत गाडगेबाबा घरी यायचे, दरवाजाबाहेर उभं राहून…”, उद्धव ठाकरेंनी सांगितला आजोबांच्या काळातील आठवण
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
Uddhav Thackeray Raj Thackeray
“राज ठाकरे भाषण करून गेले तिथे अडरवर्ल्डच्या मदतीने…”, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप; म्हणाले, “अनेक मतदारसंघांत गुंडांच्या टोळ्यांना…”
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “रतन टाटांसारखा सभ्य व्यावसायिक सगळ्यांना आवडतो मग राजकारणी डँबिस…”

पाहा व्हिडीओ –

नक्की वाचा >> ठाकरे गटाला मोठा दिलासा! न्यायालयाच्या दणक्यानंतर BMC ने स्वीकारला लटकेंचा राजीनामा; पाहा स्वीकृती पत्रात काय म्हटलंय

“हा माणूस थंड पडला आहे. आग पूर्णपणे विझलेली आहे हे कदाचित निवडणूक आयोगाच्या लक्षात आलं. हा थंड माणूस आहे त्याच्या हातात आईस्क्रीमचा कोन द्या असं आयोगाला वाटलं. म्हणूनच निवडणूक आयोगाने आइस्क्रीमचा कोन दिला. आता तो कोन घेऊन फिरेल तो आणि त्याचा मुलगा,” असा टोमणा नितेश राणेंनी लगावला. शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट त्यानंतर पक्षावरील दाव्यावरुन झालेला वाद. वादानंतर दोन्ही गटांना शिवसेना नाव वापरण्यास निवडणूक आयोगाने घातलेली तात्पुरती बंदी. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचं न्यायालयापर्यंत गेलेलं राजीनामा नाट्य यासारख्या घडामोडी मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी आहेत. त्यातच याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला ढाल-तलवार हे तर ठाकरे गटाला धगधगती मशाल हे चिन्ह देण्यात आलेलं आहे.

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला सोमवारी ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले होते. याआधी शिंदे गटाने ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘गदा’ ही तीन पर्यायी चिन्हे आयोगाकडे सादर केली होती. ‘उगवता सूर्य’ हे चिन्ह खुल्या यादीत नव्हते, ‘त्रिशूळ’ आणि ‘गदा’ या चिन्हांना धार्मिक संदर्भ होता. शिवाय, ‘त्रिशूळ’ या चिन्हाचा पर्याय ठाकरे गटानेही दिला होता. त्यामुळे शिंदे गटाने दिलेले तीनही पर्याय आयोगाने फेटाळले आणि मंगळवारी नवे तीन पर्याय देण्यास सांगितले होते. त्यानुसार, दिलेल्या चिन्हांमधून आयोगाने शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्हाचे वाटप केले आहे. आयोगाने ठाकरे गटाला ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ व शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नव्या पक्षनावांचे वाटप केले आहे.