Andheri East Assembly Constituency Straigh Fight Between ShivSena Thackeray Faction vs BJP : २००९ मध्ये नव्याने तयार करण्यात आलेला अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाचा गड बनला आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सुरेश शेट्टी यांनी शिवसेनेचे (संयुक्त) उमेदवार रमेश लटके यांचा पाच हजार मतांनी पराभव केला होता. मात्र २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत रमेश लटके यांनी या मतदारसंघात सहज विजय मिळवला होता. दोन वर्षांपूर्वी रमेश लटके यांचं दुबईत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली. विरोधी पक्षांनी येथे त्यांचे उमेदवार उभे केले नाहीत. परिणामी ऋतुजा लटके यांनी ६६,५३० मतांसह या मतदारसंघात विजय मिळवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रमेश लटके हे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्याआधी ते नगरसेवकही होते. आता त्यांच्या जागेवर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. ऋतुजा या मुंबई महापालिकेत कारकून (क्लर्क) होत्या. मागील दहा वर्षांहून अधिक काळापासून त्या महापालिकेत नोकरी करत होत्या. आता त्यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. ऋतुजा लटके या राजकारणात फारशा सक्रिय नव्हत्या. तसेच पोटनिवडणुकीच्या आधी त्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. ऋतुजा यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट करत “आम्ही सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर असू”, असं म्हटल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
निष्ठांवंतांना उमेदवारी मिळण्यची शक्यता
दरम्यान, शिवसेना फूटल्यानंतर रमेश लटके यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याऐवजी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर थांबणं पसंत केलं होतं. त्यामुळे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा ठाकरे गट निष्ठावंत लटकेंच्या कुटुंबातील सदस्याला विधानसभेचं तिकीट देऊ शकतो. ऋतुजा लटके पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात उतरू शकतात.
हे ही वाचा >> Shirdi Assembly Constituency: शिर्डी विधानसभा: विखेंचा गड यंदा ढासळणार की शाबूत राहणार?
महायुतीत संघर्ष
महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळेल असं चित्र दिसत असलं तरी महायुतीत ही जागा कोणाला मिळणार हे अद्याप कळायला मार्ग नाही. महायुतीत शिवसेनेचा शिंदे गट व भारतीय जनता पार्टी या जागेसाठी संघर्ष करत असल्याचं बोललं जात आहे. तसेच अजित पवार गटही या जागेसाठी आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा >> Dombivli Assembly Constituency : भाजपाच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडी सुरुंग लावणार का? डोंंबिवलीत बहुरंगी लढतीची शक्यता!
शिंदे गट व भाजपा जागांची अदलाबदली करणार?
जागावाटपावरून महायुतीत अंतर्गत वाद होऊ नये यासाठी शिवसेनेचा शिंदे गट व भारतीय जनता पार्टीने जागांची अदलाबदली करण्याचा निर्णय घेतल्याचे दावे काही वृत्तपत्रांनी केले आहेत. अंधेरी पूर्व मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी भाजपाचे मुरजी पटेल आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून प्रदीप शर्मा इच्छुक आहेत. या वादावर तोडगा काढण्यासाठी एकनाथ शिंदे अंधेरी पूर्व ही जागा भाजपासाठी सोडणार आहेत आणि या जागेच्या बदल्यात प्रदीप शर्मा यांच्यासाठी दिंडोशी मतदार संघ मागून घेणार आहेत.
हे ही वाचा >> नागपूर दक्षिण-पश्चिम: भाजपाच्या बालेकिल्ल्यात देवेंद्र फडणवीसांना कुणाशी द्यावी लागेल लढत?
हा विधानसभा मतदारसंघ वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला होता.
ताजी अपडेट
अंधेरी (पूर्व) मतदारसंघातून एकूण २४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ७ अर्ज बाद करण्यात आले आहेत. तर, १७ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. शिवसेनेने (शिंदे) येथून मुरजी पटेल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर, शिवसेनेने (ठाकरे) त्यांच्याविरोधात ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय वंचितचे संजीवकुमार कालकोरी हे देखील येथून विधानसभेच्या रिंगणात आहेत.
ऋतुजा लटके यांचं पारडं जड असलं तरी वंचित बहुजन आघाडीचा त्यांना फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र काँग्रेस व शिवसेनेची (ठाकरे) मतं एकत्र झाल्यास लटके यांचा विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात मतदान पार पडलं. राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढल्याचं चित्र आहे.मुंबई उपनगरांत ५५.७७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. या मतदारसंघात मतदारांकडून संमिश्र प्रतिसाद होता. या मतदारसंघात मतदान केंद्रांची संख्या वाढवल्यामुळे लोकसभेप्रमाणे मतदारांची अडचण झाली नाही.