Andheri East Bypoll Election Updates : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये ऋतुजा लटके या मोठ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत त्यांना ४२७७ मते तर दुसऱ्या फेरीत ७८१७ मते मिळाली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली मनपा शाळेमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. या मतमोजणीसाठी २०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, राज्य शासनाची विविध खाती, बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई मेट्रो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासारख्या विविध संस्थांच्या अखत्यारीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेसाठी मुंबई पोलीस दलाचे ३०० अधिकारी व कर्मचारी आणि इतर सुरक्षा यंत्रणाही कर्तव्यावर तैनात आहेत. तसेच २० सूक्ष्मस्तरीय निरीक्षक या मतमोजणीस हजर आहेत.

Live Updates

Andheri East Bypoll Election Updates : वाचा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या या पोटनिवडणुकीच्या निकालाचे अपडेट्स फक्त एकाच क्लिकवर

10:43 (IST) 6 Nov 2022
पहिल्या फेरीअंतीची आकडेवारी

ऋतुजा लटके- 4277, बाला नाडार – 222, मनोज नाईक – 56, मीना खेडेकवर- 138, फरहान सय्यद- 103, मिलिंद कांबळे- 79, राजेश त्रिपाठी- 127, नोटा -622 आणि एकूण मत – 5624

10:40 (IST) 6 Nov 2022
पोटनिवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात

'अंधेरी पूर्व' विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. टपाली मतपत्रिकांच्या गणनेसाठी एक मेज (Table) असणार असून, 'ईव्हीएम' आधारित मतमोजणीसाठी १४ मेज असणार आहेत.‌ मतमोजणीच्या एकूण १९ फेऱ्या होणार आहेत. त्यापैकी दोन फेऱ्या आतापर्यंत पार पडल्या आहेत. या मतमोजणीत नोटा या पर्यायाचा किती जण वापर करतात या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विरोधकांनी मतदारसंघात नोटा या पर्यायाचा प्रचार केला होता असा आरोप शिवसेनेने केला होता.

10:40 (IST) 6 Nov 2022
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल

शिवसेनेतील बंडानंतर आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या अगोदर झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा आज(६ नोव्हेंबर) निकाल लागणार आहे. ३ नोव्हेंबर रोजी या जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. वाचा सविस्तर बातमी…

या मतमोजणीत नोटा या पर्यायाचा किती जण वापर करतात या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विरोधकांनी मतदारसंघात नोटा या पर्यायाचा प्रचार केला होता असा आरोप शिवसेनेने केला होता.