राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवार अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवार नसणार आहे. तर शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यांच्याविरोधात भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली असून ही लढाई भाजपा विरुद्ध ठाकरे गट असणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आज(शुक्रवार) दादर येथे प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंची मशाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हाती अन् शरद पवार त्यावर… – चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान

Rajiv Kumar
Election Commission : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचं महाराष्ट्राला पत्र; ‘या’ विषयावर व्यक्त केली नाराजी!
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Sharad Pawar Group Leader Said this thing About Mahayuti
Sharad Pawar : “महायुतीतला मोठा मासा लवकरच आमच्या पक्षात”, शरद पवारांच्या पक्षातील नेत्याचा रोख कुणाकडे?
Maharashtra News Live Update in Marathi
Maharashtra News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करताच भाग्यश्री आत्राम यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
rohit pawar ajit pawar
Rohit Pawar on Mahayuti: “भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने परवा अजितदादांना…”, रोहित पवारांची पोस्ट; म्हणाले, “शिंदे गटाला १७ जागा…”
Chhagan Bhujbal
अजित पवार शस्त्र टाकणे अशक्य; छगन भुजबळ यांचा विश्वास
Maharashtra News Live Update in Marathi
Maharashtra News : “आम्हाला १०० जागा द्यायला पाहिजेत”, जागावाटपाबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
gulabrao patil controversial statements marathi news
गुलाबरावांची वादग्रस्त विधानांची पाटीलकी

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “मुरजी पटेल यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. मला विश्वास आहे की ५१ टक्के मतं घेऊन, मुरजी पटेल हे १०० टक्के विजयी होतील. ही निवडणूक १०० टक्के महत्त्वाचीच असणार आहे. कोणतीही निवडणूक ही महत्त्वाचीच असते. पण अंधेरीची निवडणूक ही मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाची आहे.”

Andheri East Bypoll Election Live : “कोण मुरजी पटेल? मी ओळखत नाही”, भाई जगताप यांचा भाजपा उमेदवाराला खोचक टोला, वाचा लाईव्ह अपडेट्स…

तर ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून घडलेल्या घडामोडींबाबत बोलताना बावनकुळेंनी “मला वाटतं राजीनामा स्वीकारणे अथवा न स्वीकारणे हा महानगर पालिकेचा अधिकार आहे. न्यायालयाने आपला न्यायालयीन अधिकार वापरला. भाजपा म्हणून आमचा कुठेही यामध्ये संबंध नाही. जे उमेदवार देतील त्याच्याविरोधात आम्हाला लढायचं आहे. त्यामळे कोणीही उमेदवार आला तरी आमची लढाई पक्की आहे. ५१ टक्के मतं घेऊन आम्ही जिंकणार आहोत.” अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली.

याशिवाय “प्रत्येक निवडणुकीच्यावेळचं राजकारण वेगळं असतं. शेवटी निवडणुकीचे उमेदवार हे अत्यंत महत्त्वाचे असतात. या निवडणुकीचा मुंबई महपालिका निवडणुकीशी संबंध येईल असं मला फारसं वाटत नाही. पण तरी निवडणूक ही निवडणूक असते, त्याचे काही परिणाम होत असतात. पण त्यावेळीचे उमेदवार आणि राजकीय गणितं ही वेगळी असतात, महानगरपालिका म्हणून लोक वेगळी मत देतात तर विधानसभेला वेगळी मतं देतात. त्यामुळे फार काही तुलना करू नये.” असंही बावनकुळे यावेळी म्हणाले.