धोकादायक बनलेला अंधेरीमधील गोखले पूल सोमवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून या परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळविण्यात आली आहे. या मार्गांवरील फेरीवाले हटवण्यासाठी सलग काही दिवस कारवाईची मोहीम हाती घेण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. त्यासाठी पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>मुंबई:फुकटे प्रवासी उत्पन्नाच्या मुळावर;बेस्टचा १.१३ लाख प्रवाशांवर कारवाईचा बडगा वाहक नसलेल्या बसमध्ये फुकट्यांची घुसखोरी

अंधेरीमधील गोखले पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू असतानाच पुलाचा जुना भाग धोकादायक बनल्याचा अहवाल मुंबई महानगरपालिकेच्या सल्लागाराने दिला. त्यामुळे प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या. वाहतूक विभागाच्या मदतीने पर्यायी मार्ग उपलब्ध करून सोमवारपासून हा पूल वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला. वाहतूक पोलिसांनी पाच पर्यायी मार्ग दिले आहेत. मात्र या मार्गांवर अनेक ठिकाणी फेरीवाले असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे या फेरीवाल्याना हटवण्याची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे. गुरुवारपासून सलग काही दिवस ही मोहीम चालणार आहे.

हेही वाचा >>>मुंबई:जॉन्सनच्या बेबी टाल्कम पावडरचे आणखी नमुने तपासले का?

हे पर्यायी मार्ग डी. एन. नगर, ओशिवरा आणि जुहू पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येतात. फेरीवाले हटवताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दोन पाळ्यांमध्ये बंदोबस्त उपलब्ध करावा, अशी मागणी महानगरपालिकेच्या के-पश्चिम विभाग कार्यालयाने परिमंडळ ९ च्या पोलीस उपायुक्तांना पत्र पाठवून केली आहे.पुढील काही दिवसात जे. पी. रोड, एस. व्ही. रोड, गजधर रोड, आंबोली सिग्नल, रुबी हॉस्पिटल परिसर, बेहराम बाग सिग्नल, अजित ग्लास सिग्नल, इर्ला सोसायटी रोड, व्ही. एम. रोड, मिठीबाई महाविद्यालय परिसर येथील फेरीवाले हटवण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andheri gokhale bridge campaign to remove hawkers from alternative roads mumbai print news amy
Show comments