मुंबई : माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन हे गणेश दर्शनासाठी मुंबईत आले असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे मंगळवारी दुपारी त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या केलेल्या चाचण्यांमध्ये त्यांच्या हृदयाच्या एक रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने अँजिओग्राफी करण्यात आली. सध्य त्यांची प्रकृती स्थिर आहे.
हेही वाचा – “हा तुमचा पक्षाला इशारा आहे का?”, पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “मी त्यांना…”
हेही वाचा – मुंबईत पावसाचा परतीचा प्रवास १० ऑक्टोबरनंतर?
मुंबईत मंगळवारी गणेश दर्शन करण्यासाठी आलेल्या माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांना तत्काळ लीलावती रुग्णालयात दाखल केले. श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. जलील पारकर यांनी त्यांची तपासणी केली. त्यांच्या ईसीजी चाचणीत काही बदल दिसल्याने त्यांना रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञ डॉ. सुरेश विजन यांच्याकडे दाखविण्यात आले. डॉ. सुरेश विजन यांनी हुसेन यांचे सर्व अहवाल तपासल्यानंतर तातडीने त्यांची अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांना एक ब्लॉक आढळून आला. त्यावेळी त्यांनी अँजिओप्लास्टी करून तेथे स्टेण्ट बसविला. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.