अनिल परब यांनी वांद्रे येथील म्हाडाची जमीन हडपल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांनंतर म्हाडाकडून अनिल परब यांनी नोटीस देत कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी अनिल परब यांनी आक्रमक होत आज विधानपरिषदेत किरीट सोमय्या आणि म्हाडा विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढवणाची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “सोमय्या तक्रार करतात अन् ईडी कारवाई करते”, मुश्रीफांच्या आरोपांनंतर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सोमय्यांच्या चौकशीचे निर्देश!

काय म्हणाले अनिल परब?

यासंदर्भात बोलतान “वांद्रेतील गांधीनगर सोसायटी येथील इमारत क्रमांक ५७ आणि ५८ या दोन इमारतीमधील मोकळ्या जागेवर मी अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार विलास हेगले यांनी गृहनिर्माण विभागाकडे केली होती. या तक्रारीच्या आधारे म्हाडाने मला अनधिकृत बांधकाम हटविण्याची नोटीस दिली. या यासंदर्भात माझ्याबद्दल अनेक वृत्तपत्रात बातमीही प्रकाशित झाली. पण ही जागा माझ्या नावावर नसल्याचं तपासातून पुढे आलं. त्यानंतर म्हाडाने ही नोटीस मागेही घेतली. पण याला वृत्तपत्रात कुठेही प्रसिद्धी मिळाली नाही. त्यामुळे याप्रकरणाने माझी नाहक बदनामी झाली”, असा आरोप अनिल परब यांनी केला.

हेही वाचा – पुण्यातील मासिक पाळी प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल, रुपाली चाकणकर म्हणाल्या; “दोन दिवसांपूर्वी…”

किरीट सोमय्या यांनाही केलं लक्ष्य

पुढे बोलताना त्यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनाही लक्ष्य केलं. “म्हाडाच्या नोटीस नंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत माझ्यावर संबंधित जमीन बळकावल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी लोकायुक्तांकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली. लोकप्रतिनिधी म्हणून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न किरीट सोमय्या यांनी केला”, अशी टीका त्यांनी दिली.

हेही वाचा – VIDEO: सासरच्यांनी सुनेचे हातपाय बांधून मासिक पाळीचं रक्त विकलं, चंद्रकांत पाटील म्हणाले, “भयंकर…”

सोमय्यांविरोधात हक्कभंगाची नोटीस

दरम्यान, याप्रकरणी मी महाराष्ट्र विधान परिषद नियम २४१ अन्वये म्हाडाचे मुख्य अधिकारी मिलिंद भूरीकर आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात हक्कभंगाच्या कारवाईसाठी पत्र देत आहे. आपण हे पत्र पुढील चौकशी आणि कारवाईसाठी विशेष हक्क समितीकडे पाठवावे, अशी विनंती करतो”, असंही ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil parab right of infringement proposal against bjp leader kirit somaiya in assembly council spb